RCB vs KKR : आरसीबी विजयाची मालिका कायम राखणार की कोलकाता, कोण ठरणार वरचढ? पाहा Playing 11
RCB vs KKR Playing XI : आज IPL 2023 चा 36 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात होणार आहे. हा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार असून आरसीबी की कोलकाता यांच्यामध्ये कोण ठरणार वरचढ हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
IPL 2023, RCB vs KKR Dream11 Prediction : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) चा 36 वा सामना आज (26 एप्रिल 2023) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या दोन्ही संघामध्ये आरसीबी आणि केकेआर विजयाची मालिका कायम ठेवण्याच प्रयत्न करतील. रॉयल चॅलेंजर बंगळुरूने आतापर्यंत सातपैकी चार सामने जिंकून पॉइंट टेबलवर पाचव्या स्थानावर आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स सातपैकी दोन सामने जिंकून आठ स्थानकावर कायम आहे. परिणामी या दोन्ही संघांमध्ये कोणता संघ वरचढ ठरणार हे पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे.
कोणता संघ ठरणार वरचढ?
आयपीएलच्या (IPL 2023) पहिल्या क्रमांकावर असलेल्या राजस्थान रॉयल्सचा पराभव करून आरसीबीने (RCB) गुणतालिकेत मोठी आघाडी घेतली असती. आरसीबी संघातील विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांच्या चांगल्या कामगिरीमुळे यंदाच्या हंगामात चार सामने जिंकले. तर दुसरीकडे अनुभवी फलंदाजीची फळी असूनही केकेआरला पहिल्या पाच सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आजचा सामना कर्णधार नितीश राणा यांच्यावर असेल. त्यामुळे आजचा सामना जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याचा केकेआरचा प्रयत्न असणार आहे. तर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस केकेआरला हरवून आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीत सामील होण्याचा प्रयत्न करताना दिसतील.
खेळपट्टीचा अहवाल
आयपीएलच्या या हंगामात बंगळुरूची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी फायदेशीर ठरली आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये थोडासा स्विंग मिळू शकतो. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये दव पडल्यामुळे गोलंदाजांना अवघड जाऊ शकते. येथे वेगवान गोलंदाजांना फटका बसला तर फिरकीपटूचा वेग काही प्रमाणात रोखला जाऊ शकतो.
कोणता संघ कितव्या क्रमाकांवर?
आयपीएल सुरू झाल्यापासून राजस्थान रॉयल्सल पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थानकांवर होते. त्यानंतर चेन्नई सुपरकिंग्सने राजस्थान रॉयल्सला सलग दोन्ही आघाड्यांवर पराभूत करून पहिले स्थान पटकावले आहे. त्यानंतर गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत आयपीएलच्या गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. तर आता आरसीबी पाचव्या तर केकेआर आठव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
सामना कधी आणि कुठे पाहाल?
आरसीबी आणि कोलकाता यांच्यात आजचा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार असून नाणेफेकीची वेळ 30 मिनिटे आधी होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' अॅपवर उपलब्ध असेल. या अॅपवर तुम्ही हा सामना मोफत पाहू शकता. येथे तुम्ही 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहू शकता.
दोन्ही संघांची संभाव्य Playing 11
आरसीबी : फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, प्रभु देसाई, दिनेश कार्तिक, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, सिराज, हर्षल पटेल
केकेआर: जगदीसन, सुनील नरेन, नितीश राणा, जेसन रॉय, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, डेव्हिड वाईज, उमेश यादव, चक्रवर्ती, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा