IPL 2023 Rules: क्रिकेटचा महाकुंभ अशी ओळख असणाऱ्या आयपीएलची सुरुवात 31 मार्चपासून होणार आहे. गेल्या कैक वर्षांमध्ये बदललेल्या क्रिकेट जगतात आयपीएलला महत्त्वाचं स्थान मिळालं आहे. जिथं अनेक नवोदित कलाकारांना आपल्या दमदार खेळाचं प्रदर्शन करण्याची संधी मिळते. यावर्षीसुद्धा आयपीएलमध्ये असेच काही खेळाडू आपल्या खेळानं वरिष्ठांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण, तत्पूर्वी त्यांचा कसून सराव सुरु आहे आणि आयपीएलमध्ये करण्यात आलेल्या बदलांनाही ही मंडळी सध्या समजून घेताना दिसत आहेत. 


हेसुद्धा वाचा : Asia cup 2023 : पाकिस्तानातच होणार आशिया चषक; भारतीय संघ खेळणार की नाही? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IPL 2023 मध्ये काही महत्त्वाचे नियम बदलण्यात आले आहेत. संघातील खेळाडूंसोबतच कर्णधारांचंही या बदलांवर लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्हाला हे बदललेले नियम माहितीयेत का? माहित नसतील तर आताच पाहून घ्या.... (IPL 2023 Rules playing 11 wide no ball drs and many more changes read detail latest sports news in marathi )


- स्लो ओव्हर रेटसाठी शिक्षा 


आयपीएलमध्ये कोणत्याही सामन्यात संघाकडून ठरलेल्या वेळेत Overs टाकल्या गेल्या नाहीत तर, प्रत्येक ओव्हरदरम्यान त्या संघाला 30 यार्डच्या बाहेर फक्त 4 खेळाडूंनाच Fielding साठी ठेवण्याची परवानगी असेल. 


- इम्पॅक्ट प्लेअर रुल 


हा नियम आयपीएलमध्ये अनेक सामन्यांची बाजी पलटू शकतो. कारण, इथं टॉसनंतर संघाच्या कर्णधाराला प्लेइंग 11 सोबतच 5 राखीव खेळाडूंचीही नावं द्यावी लागणार आहेत. 14 व्या षटकानंतर या पाचपैकी कोणा एका खेळाडूला Impact Player म्हणून मैदानात उतरवता येईल. पण, पाऊस किंवा तत्सम कोणत्या कारणामुळं 10 षटकांचाच सामना खेळवला गेला तर मात्र हा खेळाडू मैदानात येऊ शकणार नाही. 


- Wicketkeeper च्या चुकीची शिक्षा संपूर्ण संघाला 


नव्या नियमानुसार यंदाच्या आयपीएलमध्ये कोणत्याही सामन्यामध्ये जर, Wicketkeeper किंवा Fielder त्यांची जागा बदलतात तर, अंपायर त्या चेंडूला बाद म्हणून घोषित करतील. परिणामी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात 5 पेनल्टी धावा जोडल्या जातील. 


- वाईड आणि नो बॉलसाठी डीआरएस 


यंदाच्या आयपीएलमध्ये अचूक निर्णय घेण्यासाठी आणि अधिकाधिक योग्य निर्णयांसाठी वाईड आणि नो बॉलवरही डीआरएस मिळणार आहे. याआधी खेळाडू बाद किंवा नाबाद पाहण्यासाठीच या नियमाचा वापर केला जात होता. 


- नाणेफेक झाल्यानंतरही संघात बदल करता येणार 


यंदाच्या वर्षी आयपीएलदरम्यान, सर्व संघ नाणेफेक झाल्यानंतरही त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये बदल करु शकणार आहेत. बरं, प्लेइंग इलेवनची नावं देताना पाच राखीव खेळाडूंची नावंही कर्णधारांना द्यावी लागणार आहेत.