IPL 2023: बलात्कार प्रकरणात जेलमधून जामीनावर बाहेर आलाय हा IPL खेळणारा खेळाडू; आता पुन्हा गाजवतोय क्रिकटचे मैदान
Sandeep Lamichhane IPL 2023: संदीप लामिछाने याला बलात्कार प्ररणात त्याला अटक झाली होती. सध्या तो तीन महिन्यांसाठी जामीनावर बाहेर आला आहे. सध्या तो नेपाळच्या टीममध्ये खेळत आहे.
Sandeep Lamichhane IPL 2023: बलात्कार प्रकरणात जेलमधून जामीनावर बाहेर आलेला IPL खेळणारा खेळाडू सध्या पुन्हा एकदा क्रिकटचे मैदान गाजवत आहे. संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) असे या खेळाडूचे नाव आहे. बलात्कार प्रकरणात त्याला अटक झाली होती. सध्या तो तीन महिन्यांसाठी जामीनावर बाहेर आला आहे. सध्या तो नेपाळच्या टीममध्ये खेळत आहे.
आयपीएलमध्ये दिल्ली संघाकडून खेळला होता. नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा तो कर्णधार देखील आहे. सप्टेंबर 2022 मध्ये त्याच्यावर बलात्काराचा आरोप झाला. एका अल्पवयीन मुलीने त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन संदीप याला अटक केली. जानेवारी 2023 मध्ये संदीपला कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. तीन महिन्यांसाठी त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
आयपीएलमध्ये खेळणारा पहिला नेपाळी खेळाडू
आयपीएलमध्ये खेळणारा संदीप लामिछाने हा पहिला नेपाळी खेळाडू आहे. 2018 मध्ये त्याला दिल्ली संघाने त्याला खरेदी केलं होतं. त्यावेळी संदीपचं वय हे 17 वर्षे इतकं होतं. 20 लाखांना दिल्ली संघाने त्याला आपल्या ताफ्यामध्ये सामील केलं होतं. 17 वर्षाच्या खेळाडूला आयपीएलमध्ये घेतल्यामुळे संदीप चर्चेत आला होता. संदीप हा लेग स्पिनर प्लेयर आहे. 2016 च्या अंडर-19 विश्वचषकामध्ये त्याने दमदार कामगिरी केली होती. त्यावेळी नेपाळचा संघ आठव्या स्थानावर राहिला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायरल क्लार्कसुद्धी संदीपच्या कामगिरीने प्रभावित झाला होता.
जामीनावर बाहेर आलेल्या संदीपचा मैदानात कल्ला
बलात्काराच्या गुन्ह्यामुळे संदीपचे करिअर धोक्यात येईल अशी भिती व्यक्त केली जात होती. मात्र, बलात्काराच्या गुन्ह्यात बाहेर आलेल्या संदीपने क्रिकटच्या मैदानावर धुमाकूळ घातला आहे. जानेवारी महिन्यात संदीपला जामीन मिळाला आणि तो जेलबाहेर आला. तेव्हापासून त्याने तब्बल 10 एकदिवसीय सामने खेळले आहेत. न्यू गिनी, नामिबिया विरुद्धच्या सामन्यात संदीपने लेक्षवेधी खेळी खेळली आहे.