SRH vs MI IPL 2023 Playing 11 : आयपीएलमध्ये आज पंचविसवा सामना खेळवला जात असून मुंबई इंडियन्स (Mumabi Indians) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आमने सामने आहेत. सुरुवातीच्या खराब सुरुवातीनंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विजयी पथावर आले आहेत. स्पर्धेतील पहिले दोन सामने हरल्यानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सने पुढचे दोन्ही सामने जिंकत दमदार पुनरागमन केलं आहे. तर सनरायझर्स हैदराबादलाही पहिल्या दोन सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) आणि लखनऊ सुपर जायंट्सकडून (LSG) पराभव स्विकारावा लागला होता. पण एकामागोमाग दोन सामने जिंकत हैदराबादने कमबॅक केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सचे फलंदाज फॉर्मात
मुंबई इंडियन्ससाठी चांगली गोष्ट म्हणजे प्रमुख फलंदाज फॉर्मात आले आहेत. स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) गेल्या सामन्यात दमदार फलंदाजी केली. तर इशान किशनने (Ishan Kishan) त्याला चांगली साथ दिली. या सामन्यात रोहित शर्मा मैदानात उतरणार की सूर्यकुमारच्याच नेतृत्वात मुंबई खेळणार हे लवकरच स्पष्ट होईल. 


अर्जुन तेंडुलकरला बसवणार?
तब्बल दोन हंगामाच्या प्रतीक्षेनंतर तिसऱ्या हंगामात मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला संधी दिली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरचं आयपीएलमध्ये पदार्पण झालं. पण त्याला केवल दोन षटकंच टाकण्याची संधी मिळाली. दोन षटकात त्याने सतरा धावा दिल्या. पण आता मुंबई इंडियन्सचा हुकमी गोलंदाज जोफ्रा आर्चर फिर झाला आहे. आजच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता असून आर्चरच्या पुनरागमनामुळे मुंबईची गोलंदाजी भक्कम होणार आहे. पण आर्चर खेळल्यास अर्जुनला बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे. 


दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर गेल्या वर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळू शकला नव्हता. पण यानंतरही फ्रँचाईजने त्याला संघाबरोबर कायम ठेवलं. 2022 च्या ऑक्शनमध्ये जोफ्रा आर्चरवर 8 कोटींची बोली लावत मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघात घेतलं. पण दुखापतीमुळे तो 18 महिने क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतल्या T20 लीगमध्ये त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आता तो आयपीएलसाठी सज्ज झाला आहे. आता मुंबई इंडियन्स काय निर्णय घेणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. 


हैदराबाद संघ कायम ठेवणार?
दुसरीकडे आजच्या सामन्यासाठी सनरायजर्स हैदराबादही आपल्या संघात मोठे बदल करण्याची शक्यता कमीच आहे. कर्णधार एडन मार्करम आणि हॅरी ब्रूक जबरदस्त फॉर्मातआहेत. याशिवाय हेनरी क्लासेने आणि अभिषएक शर्माही फॉर्मात आहेत. मयंक अग्रवालच्या बॅटमधून धावांचा ओघ कमी झाला आहे. पण तो फॉर्मात येईल अशी संघाला अपेक्षा आहे. गोलंदाजीत टी नटराजन आणि उमरान मलिक लौकीला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरतायत. 


मुंबई इंडियन्स संभाव्य Playing XI
ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, टिम डेविड, नेहल वढेरा, कॅमरन ग्रीन, तिलक वर्मा, अर्जुन तेंडुलकर/जोफ्रा आर्चर, ऋतिक शौकीन, पीयूष चावला, डुआन यानसन, राइली मेरेडिथ


सनराइजर्स संभाव्य Playing XI
राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम (कर्णधार), हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), मार्को यानसन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्केंडेय, उमरान मलिक, टी नटराजन