मुंबई : आयपीएलचा पंधरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. अगदी शेवटचे 4 सामने शिल्लक राहिले आहेत. बीसीसीआयने 16 व्या सत्राबाबत मोठी घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने पुढच्या हंगामातील सामन्यांबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. IPL 2023 चे सामने दुपारी 3.30 आणि संध्याकाळचे सामने 7.30 ला सुरू होणार नाहीत. या वेळेत बदल करण्यात आला आहे. सामने संध्याकाळी 4 वाजता आणि रात्री 8 वाजता सुरू होतील. 


डबल हेडर सामन्यांची संख्याही पुढच्या वर्षी कमी करण्यात येणार आहे. याआधी देखील अशा वेळांवर सामने खेळवण्यात आले आहेत. स्टार स्पोर्ट्सने जेव्हा ब्रॉडकास्टिंगचे हक्क घेतले तेव्हा हा बदल करण्यात आला होता. 


2023 च्या ब्रॉडकास्टिंगचे अधिकार कोणाला जाणार याबाबतही उत्सुकता कायम आहे. ब्रॉडकास्टींगचे हक्क कोणाकडे राहणार याबाबत अजून अधिकृत घोषणा बाकी आहे. 


आयपीएल लीग संपल्यानंतर 12 जूनला ऑक्शन होणार आहे. 2023-27 पर्यंत प्रसारणाचे अधिकार कोणाकडे जाणार याचा लिलाव होणार आहे. अर्ध्याहून जास्त कंपन्यांनी बोली लावली आहे.  


स्टार इंडिया, वायकॉम 18, अॅमेझॉन, झी, ड्रीम इलेव्हन, दक्षिण आफ्रिकेचा सुपरस्पोर्ट्स चॅनल ग्रुप आणि यूकेचा स्काय स्पोर्ट्स हे प्रसारण हक्क विकत घेण्याच्या शर्यतीत आहेत. याशिवाय गुगलने आयपीएलचे प्रसारण हक्क खरेदी करण्यातही इंटरेस्ट दाखवला आहे. आयपीएलचे प्रसारण हक्क खरेदी करताना कोणत्या कंपनीला मिळतात हे पाहावं लागणार आहे.