IPL 2023: तुझा फेवरेट शॉट कोणता? Yuzi Chahal च्या प्रश्नावर Jos buttler ने दिलं हे उत्तर!
Jos buttler favorite shot: सामना संपल्यानंतर नेहमीप्रमाणे युझवेंद्र चहलने (Yuzi Chahal) जोस बटलरशी (Jos buttler) गप्पा मारल्या. यादरम्यान चहलने त्याला त्याच्या आवडत्या शॉटबद्दल प्रश्न विचारला. त्यावर बटलर म्हणातो...
Yuzi Chahal, Jos buttler: मागील वर्षी राजस्थानची (Rajasthan Royals) आयपीएल ट्रॉफी थोडक्यात हुकली. मागल्या वर्षीच्या फायनलमध्ये गुजरातने राजस्थानचा पराभव केला होता. त्यामुळे राजस्थानचा संघ यंदा (IPL 2023) नव्या दमाने मैदानात उतरला आहे. पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) 72 धावांनी पराभव केला. या सामन्यात सलामीवीर जॉस बटलरची (Jos buttler) वादळी इनिंग पुन्हा पहायला मिळाली. अशातच आता बटलरने त्याच्या फेवरेट शॉटविषयी (Jos buttler favorite shot) खुलासा केला आहे.
काय म्हणाला Jos buttler?
सामना संपल्यानंतर नेहमीप्रमाणे युझवेंद्र चहलने (Yuzi Chahal) जोस बटलरशी (Jos buttler) गप्पा मारल्या. यादरम्यान चहलने त्याला त्याच्या आवडत्या शॉटबद्दल प्रश्न विचारला. त्यावर बटलरने सरळ उत्तर दिलं. माझा स्कूप शॉट हा आवडता शॉट आहे, असं बटलर म्हणाला. त्यावर त्याने स्पष्टीकरण देखील दिलंय. स्कूप शॉट (scoop shot) हा माझा आवडता शॉट (favorite shot) आहे आणि मी शक्य तितक्या वेळा खेळण्याचा विचार करेन, असं बटलर म्हणाला आहे.
Yuzi Chahal ची फिरकी
युझीने बटलरची फिरकी घेतली. हा शॉट तुला आवडतो तर तू हा शॉट पहिल्या सामन्यात का खेळला नाही?, असा प्रश्न केल्यावर बटलरने आत्मविश्वासाने उत्तर दिलं. "माझ्यात 100 टक्के आत्मविश्वास असेल तेव्हा मी हा शॉट खेळेन, अन्यथा मी हा स्कूप शॉट खेळणार नाही. आजच्या सामन्यात मला हा शॉट खेळावा असं वाटलं नाही आणि खेळता येईल अशी परिस्थिती नसल्यानं मी तो खेळला नाही", असं उत्तर बटलरने (Jos buttler replied Yuzi Chahal) दिलं.
पाहा VIDEO
IPL 2023 Points Table: कोणती टीम अव्वल स्थानावर? 'या' 5 संघांनी फोडला भोपळा!
दरम्यान, बटलरने पहिल्या सामन्यात 201 चेंडूत फिफ्टी पूर्ण केली. त्याने सामन्यात 22 बॉलमध्ये 54 धावा केल्या. बटलरच्या या खेळीमुळे जस्थान रॉयल्सने यंदाच्या मोसमाची धमाकेदार सुरुवात केली आहे. राजस्थानचा आगामी सामना पंजाब किंग्ससोबत (Rajasthan Royals vs Punjab Kings) होणार आहे. 5 एप्रिल रोजी गुवाहटीच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे.