CSK Team New Captain After MS Dhoni : भारतीय क्रिकेट चाहते ज्याची आतुरतेने वाट पाहातायत त्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल (IPL 2024) स्पर्धेला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होतेय. आयपीएलचा हा सतरावा हंगाम आहे. गेल्या हंगामात अंतिम सामन्यात महेंद्र सिंग धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा पराभव करत पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. आता सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स सज्ज झालीय. पण त्याआधी चेन्नई सुपर किंग्स संघात मोठो बदल होण्याची शक्यता वर्तवली जातेय. यातही कर्णधारपदावरुन बरीच चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीची शेवटची आयपीएल स्पर्धा?
चेन्नई सुपर किंग्सममध्ये मोठ्या फेरबदलाचे संकेत मिळतायत. काही दिवसांपू्र्वी एमएमस धोनीने फेसबूक पोस्ट करत आपण नव्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे धोनी कर्णधारपद सोडून मेंटोरच्या भूमिकेत दिसणार का असा कयास चाहत्यांनी लावलाय. 


2022 आयपीएल हंगामातही चेन्नई संघाने स्पर्धेच्या दोन दिवस आधी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्यामुळे या हंगामात धोनीच्या फेसबूक पोस्टचा हवाला देत नव्या हंगामात नवा कर्णधार असणार का याकडे क्रिकेट चाहत्यांचा लक्ष लागलं आहे. अशात एमएस धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा पुढचा कर्णधार कोण याचीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 


चेन्नईसमोर या खेळाडूंचा  पर्याय
एमएस धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्समोर काही मोजक्या खेळाडूंचा पर्याय उपलब्ध आहे. यात सर्वात पहिलं नाव आहे ते म्हणजे ऋतुराज गायकवाड. कर्णधारपदाच्या यादीत ऋतुराजचं नाव सर्वात आघाडीवर आहे. याशिवाय अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि दिग्गज फलंदाज अजिंक्यर रहाणेही दावेदार मानले जातायत. 2022 च्या आयपीएल हंगामात रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. पण त्याचं आणि त्याच्या नेतृत्वात संघाचीही कामगिरी खराब झाली. त्यानंतर पुन्हा एकदा धोनीने संघाची जबाबदीर सांभाळली.


रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणेचं वयही कर्णधारपदाच्या आडवं येतंय. जडेजा आणि रहाणेचं वय आता 35 आहे. अनुभव पाहाता अजिंक्य रहाणेचं पारडही जड आहे. रहाणेने गेल्या हंगामात 14 सामन्यात 326 धावा केल्या होत्या. यात दोन अर्धशतकांचाही समावेश होता. 


या हंगामात धोनीच कर्णधार
चेन्नईत कर्णधार बदलाची चर्चा सुरु असली तरी या हंगामात एमएस धोनीच कर्णधार असणार हे चेन्नई सुपर किंग्सचे मालक एन श्रीनिवासन यांनी स्पष्ट केलं आहे. पण पुढच्या म्हणजे 2025 च्या आयपीएल हंगामात मेगा ऑक्शन होणार आहे. यावेळी चेन्नई संघ नव्या कर्णधारासह नव्या संघाची बांधणी करु शकतो. 


चेन्नई सुपर किंग्स (CSK) स्क्वॉड
महेंद्र सिंह धोनी (कर्णधार/विकेटकीपर), मोइन अली, दीपक चाहर, डेवोन कॉन्वे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड़, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सैंटनर, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी आणि महेश तीक्ष्णा.