IPL 2024 : `आयुष्यात तुम्हाला एक संधी मिळेल तेव्हा...`, आकाश चोप्राची हार्दिक पांड्यावर घणाघाती टीका!
Akash Chopra criticizes Hardik Pandya : आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने (Mumbai indians) मोठा डाव खेळला असून स्टार हार्दिक पांड्या याला पुन्हा आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. त्यावर आकाश चोप्रा काय म्हणतो पाहा...
Hardik Pandya in Mumbai IPL 2024 : आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने (Mumbai indians) मोठा डाव खेळला असून स्टार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला पुन्हा आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. मुंबई इंडियन्सने याबाबत ऑफिशियल अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली. त्यासोबतच आयपीएलने देखील याबाबत पोस्ट केली अन् चर्चांवर शिक्कामोर्तब केलंय. हार्दिक पुन्हा मुंबईमध्ये आल्याने आता काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा (Akash Chopra) याने ट्विट करत हार्दिकच्या निर्णयावर नाव न घेता टीका केली आहे.
काय म्हणाला आकाश चोप्रा?
कधीतरी जीवन तुम्हाला पैसा आणि वारसा यापैकी एक निवडण्याची संधी देईल. तुम्ही जे काही निवडता ते तुम्हाला आयुष्यभर तुमच्या सोबत राहिल, असं म्हणत आकाश चोप्राने पोस्ट करत म्हटलं आहे. मुंबई इंडियन्सने घोषणा केल्यानंतर काही मिनिटातच आकाश चोप्रा याने पोस्ट करत टीकेटी झोड उठवली आहे. त्यावेळी त्याने कॅमरून ग्रीन याच्या ट्रेडवर देखील भाष्य केलं.
कॅमरून ग्रीन आरसीबीच्या ताफ्यात आल्याने आता आयसीबीची बॅटिंग ऑर्डर तगडी झालीये. एकीकडे विराट कोहली, कॅप्टन फाफ, तर पाटीदार आणि मॅक्सवेल यांची चांगली जोडी जमेल. मात्र, त्यांसाठी गोलंदाजी सर्वात अवघड विषय असणार आहे. हेझलवूड आणि हर्शल यांना सोडलं. तर हसरंगाला देखील सोडचिठ्ठी दिलीये. त्यामुळे आता फक्त 24 कोटीमध्ये आयसीबी (RCB) कसा निकाल लागणार? असा सवाल आकाश चोप्राने विचारला आहे.
मुंबई इंडियन्स
राखलेले खेळाडू : आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय सिंग, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, विष्णू विनोद.
सोडलेले खेळाडू : ख्रिस जॉर्डन, डुआन जॅनसेन, हृतिक शोकीन, झ्ये रिचर्डसन, जोफ्रा आर्चर, मोहम्मद. अर्शद खान, राघव गोयल, रमणदीप सिंग, रोली मेरेडिथ, संदीप वॉरियर, ट्रिस्टन स्टब्स.