IPL 2024 : कोणत्या संघात कोणते खेळाडू, कोणता संघ `स्ट्राँग`... एका क्लिकवर सर्व 10 संघांचा स्क्वॉड
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाचं बिगुल वाजलंय. आजपासून दहा संघांमध्ये आयपीएलच्या जेतेपदासाठी चुरस रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचं पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहेत.
IPL 2024 : देशभरातील क्रिकेटप्रेमी ज्या क्षणाची आुतरतेने वाट पाहात होते, तो क्षण अखेर आलाय. आजपासून आयपीएलच्या सतराव्य हंगामाला सुरुवात होतेय. गतविजेती चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान (RCB) चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा पहिला सामना रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha 2024) पार्श्वभूमीवर आयपीएलचं पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात 17 दिवसात 21 सामने खेळवले जाणार आहे.
आयपीएल 2024 च्या पहिल्या टप्प्यात पुढच्या सतरा दिवसात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB), दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि गुजरात टाइटन्स (GT) प्रत्येकी पाच सामने खेळणार आहे. तर चेन्नई सुपर किंग्स (CSK), सनराइजर्स हैदराबाद (SRH), मुंबई इंडियन्स (MI), राजस्थान रॉयल्स (RR), लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि पंजाब किंग्स (PBKS) प्रत्येकी चार सामने खेळणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR)सर्वात कमी म्हणजे तीन सामने खेळेल.
पहिल्या टप्प्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिल्ली कॅपिटल्स सुरुवातीचे आपले सर्व सामने होम ग्राऊंड असलेल्या फिरोजशाह कोटला मैदानाऐवजी विशाखापट्टणमध्ये खेळणार आहे. इतर सर्व संघांचे सामने त्या त्या संघाच्या होमग्राऊंडवर रंगतील. आयपीएलच्या या हंगामात जवळपास सर्वच संघात मोठे बदल झाले आहेत. काही संघांचे कर्णधार बदललेत, तर काही खेळाडू ऐन स्पर्धेआधी बाहेर पडले आहेत. काही युवा खेळाडूंना पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळणार आहे. जाणून घेऊना संर्व दहा संघांचा स्क्वॉड.
चेन्नई सुपर किंग्स (CSK)
ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), महेंद्र सिंह धोनी, मोईन अली, दीपक चाहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, महीश तीक्ष्णा, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकुर, डेरिल मिचेल, समीर रिजवी, मुस्ताफिजुर रहमान, अवनीश राव अरावली
मुंबई इंडियंस (MI)
हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव (सुरुवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर), ईशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णु विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहाल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वूड, रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्जी, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, क्वेना मफाका
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु (RCB)
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जैक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडगे, मयंक डागर, विजय कुमार वैशाक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉप्ली, हिमांशु शर्मा, राजन कुमार, कैमरन ग्रीन, अल्जारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरेन, लॉकी फर्ग्यूसन, स्वप्निल सिंह, सौरव चौहान
कोलकाता नाइट राइडर्स (KKR)
श्रेयस अय्यर (कर्णधार), नीतीश राणा, रिंकू सिंह, रहमानुल्लाह गुरबाज, फिल साल्ट, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोड़ा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन सकारिया, मिचेल स्टार्क, अंगकृष रघुवंशी, रमनदीप सिंह, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसैन
गुजरात टाइटन्स (GT)
शुभमन गिल (कर्णधार), डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, केन विलियमसन, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटिल, मोहित शर्मा, अजमतुल्लाह उमरजई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेंसर जॉनसन, संदीप वॉरियर, बी आर. शरथ
लखनऊ सुपर जाइंट्स (LSG)
केएल राहुल (कप्तान), क्विंटन डिकॉक, निकोलस पूरन, आयुष बदोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, रवि बिश्नोई, नवीन उल हक, क्रुणाल पंड्या, युद्धवीर सिंह, प्रेरक मांकड़, यश ठाकुर, अमित मिश्रा, शेमार जोसेफ, मयंक यादव, मोहसिन खान, कृष्णप्पा गौतम, शिवम मावी, अर्शिन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, एश्टन टर्नर, डेविड विली, मोहम्मद अरशद खान
राजस्थान रॉयल्स (RR)
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयसवाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठौड़, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, आवेश खान, रोवमैन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, नांद्रे बर्गर, तनुष कोटियन
दिल्ली कॅपिटल्स (DC)
ऋषभ पंत (कर्णधार), प्रवीण दुबे, डेविड वॉर्नर, विक्की ओस्तवाल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्किया, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जेक फ्रेजर-मैकगर्क, ललित यादव, खलील अहमद, मिचेल मार्श, ईशांत शर्मा, यश धुल, मुकेश कुमार, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्र, रसिक सलाम डार, झाय रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप, स्वास्तिक चिकारा
पंजाब किंग्स (PBKS)
शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंह, जितेश शर्मा, सिकंदर रजा, ऋषि धवन, लियाम लिविंगस्टोन, अथर्व ताइडे, अर्शदीप सिंह, नाथन एलिस, सैम करन, कगिसो रबाडा, हरप्रीत बरार, राहुल चाहर, हरप्रीत भाटिया, विद्वथ कावेरप्पा, शिवम सिंह, हर्षल पटेल, क्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह, शशांक सिंह, तनय त्यागराजन, प्रिंस चौधरी, रिली रोसो
सनराइजर्स हैदराबाद (SRH)
पॅट कमिंस (कप्तान), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडेन मार्करम, मार्को जानसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंगटन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंह, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंह, मयंक मार्कंडेय, उपेंद्र सिंह यादव, उमरान मलिक, नीतीश कुमार रेड्डी, फजलहक फारूकी, शाहबाज अहमद, ट्रेविस हेड, वानिंदु हसारंगा, जयदेव उनादकट, आकाश सिंह, झटवेध सुब्रमण्यन
यावेळी कसा आहे फॉर्मेट
आयपीएल 2024 चा हंगाम गेल्या हंगामाप्रमाणेच असणार आहे. यात एकूण 74 सामने खेळवेल जाणार आहे. गेला हंगाम 60 दिवस चालला होता. सामना जिंकणाऱ्या संघाच्या खात्यात 2 पॉईट जमा होतील. तर हरणाऱ्या संघाला कोणताही पॉईंट दिला जाणार नाही. सामना ड्रॉ किंवा निकाल लागला नाही तर प्रत्येक संघाला समान म्हणजे 1-1 पॉईंट दिला जाईल. ग्रुप स्टेजनंतर प्लेऑफचे सामने खेळवले जातील.
कुठे पाहता येणार सामने?
आयपीएलचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहेत. तर जिओ सिनेमावर सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जाणार आहे. डबल हेडरमध्ये पहिला सामना दुपारी चार वाजता तर दुसरा सामना रात्री 8 वाजता खेळवला जाईल.