IPL 2024 आधी मोठी घडामोड, लखनऊ सुपरजायंट्सच्या खेळाडूवर 20 महिन्यांची बंदी
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी दुबीत मिनी ऑक्शन सुरु असतानाच एक मोठी घडामोड समोर आली आहे. आयपीएलमध्ये सुपरजायंट्सचा ऑलराऊंडर नवीन उल हकवर वीस वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
IPL 2024 : आयपीएल 2024 साठी दुबईत खेळाडूंवर करोडोंची बोली लागली आहे. या लिलावात विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन खेळा़डूंचा बोलबाला पाहिला मिळाला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला (Mitchell Starc) सर्वाधिक 24.75 कोटी रुपयांची बोली लागली. आयपीएलच्या (IPL Auction) इतिहासातील ही सर्वात मोठी बोली ठरली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने स्टार्कला आपल्या संघात घेतलं. तर ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणाऱ्या पॅट कमिन्सवर (Pat Cummins) सनरायजर्स हैदराबादने तब्बल 20.50 लाखांची बोली लावत आपल्या संघात घेतलं. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडवर 6.80 कोटी आणि न्यूझीलंडच्या डेरिल मिचेलला 14 कोटींची बोली लावत चेन्नई सुपर किंग्सने आपल्या संघात घेतलं. भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलही 11.75 कोटी रुपयांना विकला गेला. पंजाब किंग्सने त्याच्यावर बोली लावली.
लखनऊच्या खेळाडूवर बंदी
एकीकडे आयपीएलमध्ये कोट्यवधींची बोली लागत असताना दुसरीकडे आयपीएलमधल्या लखनऊ सुपर जायंट्सच्या एका खेळाडूवर वीस महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. लखनऊचा ऑलराऊंडर नवीन-उल-हक एका वादात अडकला आहे. या वर्षीच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीबररोबरच्या भांडणानंतर चर्चेत आला होता. आता नवीन उल हकवर इंटरनॅशनल लीग टी20 (ILT20) मध्ये 20 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.
इंटरनॅशनल लीग टी20 स्पर्धेत नवीन उल हक (Naveen-ul-Haq) शारजाह वॉरियर्स संघाकडून पहिल्या हंगामात खेळला. दुसऱ्या हंगामातही त्याला शारजाह वॉरियर्सने संघासोबत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. पण त्याने नवीन रिटेनशन नोटीवर सही केली नाही. शारजाह वॉरियर्सच्या संघाने त्याला करारावर सही करण्याची विनंती केली. पण याकडे नवीनने दुर्लक्ष केलं. शेवटी शारजाह वॉरियर्सने कठोर पावलं उचलत नवीनवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पहिल्या हंगामात नवीने दमदार ILT20 मध्ये दमदार कामगिरी केली होती.
नवीन उल हकला शारजाह वॉरियर्ससोबत आपले चांगले संबंध कायम ठेवण्यात रस नाही, त्यामुळे कंपनीने हा कठोर निर्णय घेतल्याचं शारजाह वॉरियर्स संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने नवीन उल हकला नव्या हंगामासाठी संघात कायम ठेवलं आहे.
मिचेल स्टार्कने इतिहास रचला
दरम्यान आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने इतिहास रचला, स्टार्कची बेस प्राईज 2 कोटी रुपये इतकी होती. दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर बोली लावत सुरुवात केली. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये स्टार्कवरुन चढाओढ रंगली. बोली 9.60 कोटीपर्यंत गेली. बोली रंगत असतानाच गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने त्यात उडी घेतली आणि आणि बोली वाढवत नेली, अखेर कोलकाताना नाईट रायडर्सने यात बाजी मारत स्टार्कला 24.75 कोटी रुपयांवर आपल्या संघात घेतलं.