पॅट कमिन्सवर तब्बल 20.5 कोटी उडवणाऱ्या काव्या मारनची एकूण संपत्ती पाहून डोळे फिरतील
IPL 2024 Auction Pat Cummins Kavya Maran Net Worth: ही तरुणी मागील अनेक वर्षांपासून अनेकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळातं.
IPL 2024 Auction Pat Cummins Kavya Maran Net Worth: इंडियन प्रिमिअर लिगच्या 2024 च्या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियन संघाला वर्ल्ड कप 2023 मध्ये जेतेपद मिळवून देणाऱ्या पॅट कमिन्सला विक्रमी किंमत मिळाली आहे. पॅट कमिन्सला तब्बल 20 कोटी 50 लाख रुपये मोजून सनरायझर्स हैदराबादच्या संघाने करारबद्ध केलं आहे. आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कोणत्याही खेळाडूने 20 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अर्थात अर्ध्या तासामध्ये पॅट कमिन्सचा सर्वाधिक बोलीचा विक्रम त्याचा संघ सहकारी मिचेल मार्शने मोडीत काढत तब्बल 24.75 कोटींची बोली मिळवली आहे. मात्र पॅट कमिन्ससाठी तब्बल 20 कोटींहू अधिकीच बोली लावल्यामुळे सन रायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन या चर्चेत आहेत. अनेकदा मैदानात सामना पाहताना दिसून येणाऱ्या काव्या मारन यांची संपत्ती किती आहे तुम्हाला ठाऊक आहे का?
काव्या मारन आहेत तरी कोण?
सन रायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन या आज दुबईमध्ये झालेल्या आयपीएलच्या लिलावामध्ये सहभागी झाल्या. त्यांनी अनेक खेळाडूंवर बोली लावली आणि त्यापैकी काही डिल्स खरोखरच उत्तम ठरल्या. काव्या मारन या सनरायझर्स हैदराबाद संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ आणि मालक आहेत. त्या अनेकदा मैदानात सामने पाहायला येतात. काव्या मारन या दक्षिणेतील प्रसिद्ध उद्योजक कलानिधी मारन यांच्या कन्या आहेत. कलानिधी मारन हे सन नेटवर्कचे मालक आहेत. दक्षिणेमध्ये सन टीव्हीच्या नावाने सन नेटवर्क प्रचंड लोकप्रिय असून त्यांच्या कंपनीकडे अनेक वाहिन्यांचे हक्क आहेत. काव्या मारन यांच्या आईचं नाव कावेरी मारन असं आहे. कावेरी मारन या सन नेटवर्क प्रायव्हेट कंपनीच्या जॉइण्ट मॅनेजिंग डायरेक्ट आहेत. कावेरी मारन या उद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व आहे. त्या भारतामधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या महिला उद्योजिकांपैकी एक आहेत.
शिक्षण आणि राजकीय कनेक्शन
काव्या मारन या एका प्रसिद्ध आणि सधन कुटुंबातील आहेत. काव्या मारन सन टीव्हीमध्येही सक्रीय आहेत. काव्या यांनी युनायटेड किंग्डममधून एमबीएची डीग्री घेतली आहे. 31 वर्षीय काव्या मारन यांचा जन्म 6 ऑगस्ट 1992 रोजी चेन्नईमध्ये झाला. काव्या मारन यांचे आजोबा मुरासोली मारन हे केंद्रीय मंत्री राहिले आहेत. तर काव्या मारन यांच्या वडिलांचे बंधू हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी होते.
नक्की वाचा >> 'काव्या मारन सुंदर आहे पण तिला अक्कल नाही!' IPL Auction मधल्या एका निर्णयाने SRH ची मालकीण ट्रोल
एकूण संपत्ती किती
काव्या मारन यांची एकूण संपत्ती म्हणजेच नेट वर्थ 409 कोटी रुपये इतकी असल्याचं वृत्त जन भारत टाइम्सने दिलं होतं. कलानिधी मारन यांची एकूण संपत्ती 2019 साली 19 हजार कोटी रुपये इतकी होती. त्यांच्या संपत्तीसंदर्भातील तपशील तामिळनाडू आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2019 मध्ये देण्यात आलेला.