Bangladesh vs Sri Lanka : चट्टोग्राम येथे खेळल्या गेलेल्या अखेरच्या वनडे सामन्यात बांगलादेशला तीन धक्यावर धक्के बसले आहेत. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिजूर रहमान (Mustafizur Rahman Injured) सामन्यात गोलंदाजी करत असताना पीचवर कोसळला. त्यामुळे त्याला त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर घेऊन जावं लागलं. सामन्यादरम्यान त्याला क्रॅम्प आल्याने त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. मुस्ताफिजूरची परिस्थिती अशी होती, की त्याला मैदानातून चालत देखील बाहेर जाता आलं नाही. त्यामुळे आता आगामी आयपीएलमध्ये (IPL 2024) खेळण्याची शक्यता कमी झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, मुस्ताफिजूर रहमान आपल्या धारदार गोलंदाजीने श्रीलंकेवर प्रहार करत होता. सामन्याच्या 42 व्या ओव्हरमध्ये मुस्ताफिजूरला क्रॅम्प आला. तेव्हा तो खेळपट्टीवर कोसळला. त्यानंतर तो 48 व्या ओव्हरमध्ये मैदानात आला तेव्हा त्याला पुन्हा क्रॅम्पची समस्या जाणवू लागली. त्याला इतक्या वेदना होत होत्या की त्याला मैदान सोडावं लागलं, तेही स्ट्रेचरवर...



मुस्ताफिजूर रहमान काही दिवसांपूर्वी डोक्याला बॉल लागून जखमी झाला होता. झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर बांगलादेश प्रीमियर लीगसाठी  नेटमध्ये सराव करताना एक बॉल येऊन मुस्ताफिजूरच्या डोक्याला लागला होता. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. डोक्याचा टाके पडल्यानंतर देखील त्याने श्रीलंकेविरुद्ध खेळण्याचा ठरवलं अन् धारदार गोलंदाजी केली होती.


चेन्नईला धक्का


चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या हंगामात फास्टर गोलंदाजांची कमी जाणवू शकते. शिवम दुबे, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान आणि मथीशा पाथिराना हे तिन्ही खेळाडू जखमी आहेत. त्यामुळे तुषार देशपांडे, राजवर्धन हंगारकेकर, शार्दूल ठाकूर यांसारख्या खेळाडूंवर गोलंदाजाचा भर राहणार आहे. 


चेन्नई सुपर किंग्जचा संघ - अजय मंधवाल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेवॉन कॉन्वे (out), महीश तिक्ष्णा, मथिशा पथिराणा, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी, मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगारकेकर, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शैख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, डॅरेल मिचेल,समीर रिझवी ,शार्दूल ठाकूर , मुस्तफिजुर रहमान.


CSK चे पहिल्या टप्प्यातील सामने


चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 22 मार्च, चेन्नई, रात्री 8 वाजता
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वाजता
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 31 मार्च, वाइजैग, संध्याकाळी 7.30 वाजता
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता