IPL 2024 MS Dhoni: सर्वांना उत्सुकता असलेल्या आयपीएलच्या 17 व्या हंगामाला (IPL 2024) आता मोजकेच इतके दिवस शिल्लक राहिले आहेत. आयपीएलची पहिली लढत ही चेन्नई सुपर किंग्ज विरुद्घ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात असणार आहे. मात्र, एकट्या धोनीच्या जीवावर चेन्नई जिंकणार तरी कशी? असा सवाल विचारला जात आहे. चेन्नई (Chennai Super Kings) आयपीएलची ट्रॉफी राखू शकेल का? यावर क्रिडातज्ज्ञांनी काही मुद्दे मांडले आहेत. चेन्नईमध्ये नव्या छाव्यांना संधी दिली गेली असली तरी धोनीवरच (MS Dhoni) अवलंबून रहावं लागणार आहे. त्याचं नेमकं कारण काय पाहुया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थालाचा हुकुमी एक्का बाहेर


चेन्नई सुपर किंग्जचा आक्रमक फलंदाज आणि थाला धोनीचा हुकुमी एक्का डेव्हन कॉन्वे (Devon Conway) दुखापतग्रस्त झाल्यानं तो आयपीएलमधून बाहेर गेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना डेव्हन कॉन्वेच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला.


फास्टरला दुखापतीचं ग्रहण


चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या हंगामात फास्टर गोलंदाजांची कमी जाणवू शकते. शिवम दुबे, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान आणि मथीशा पाथिराना हे तिन्ही खेळाडू जखमी आहेत. त्यामुळे तुषार देशपांडे, राजवर्धन हंगारकेकर, शार्दूल ठाकूर यांसारख्या खेळाडूंवर गोलंदाजाचा भर राहणार आहे. 


सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र हे दोन्ही खेळाडू दुखापतीमधून उभरण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दीपक चहर आणि डॅरिल मिशेल देखील नुकतेच दुखापतीमधून सावरले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर चेन्नईचं भवितव्य अवबंलून राहिल.


अजिंक्य रहाणेला सुर गवसला


धोनीसाठी अँकरची भूमिका निभावणाऱ्या अजिंक्य रहाणे आणि मोईन अली हे दोन्ही खेळाडू फिट असून देखील फॉर्ममध्ये नव्हते. अजिंक्य रहाणे संपूर्ण रणजी सामन्यात फेल ठरला. मात्र, फायनलमध्ये अज्जूने अर्धशतक ठोकून पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. अशातच आता अजिंक्यला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


चेन्नई सुपर किंग्जचा संघ - अजय मंधवाल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेवॉन कॉन्वे (out), महीश तिक्ष्णा, मथिशा पथिराणा, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी, मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगारकेकर, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शैख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, डॅरेल मिचेल,समीर रिझवी ,शार्दूल ठाकूर , मुस्तफिजुर रहमान.


CSK चे पहिल्या टप्प्यातील सामने


  • चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 22 मार्च, चेन्नई, रात्री 8 वाजता

  • चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वाजता

  • दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 31 मार्च, वाइजैग, संध्याकाळी 7.30 वाजता

  • सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता