CSK vs RCB Head To Head: चेन्नई-बंगळूरूमध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेडमध्ये कोण वरचढ
IPL 2024 CSK vs RCB Head To Head: चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यातील पहिला सामना 28 एप्रिल 2008 रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. त्या सामन्यात चेन्नईने प्रथम खेळताना 178 रन्स केले होते.
IPL 2024 CSK vs RCB Head To Head: आजपासून इंडियन प्रिमीयर लीगचा पहिला सामना रंगणार आज चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2008 पासून दरवर्षी खेळवण्यात येतेय. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) यांच्यातील सामन्याने IPL 2024 ची सुरुवात होणार आहे. आजपर्यंत हे दोन्ही सामने अनेक वेळा आमनेसामने आले आहेत. आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी चेन्नई आणि बेंगळुरूचे हेड-टू-हेड रेकॉर्ड काय आहे आणि त्यांच्या सामन्यांमध्ये कोण वरचढ ठरलंय ते पाहूयात.
CSK vs RCB यांच्यात किती सामने खेळले गेले?
चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यातील पहिला सामना 28 एप्रिल 2008 रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. त्या सामन्यात चेन्नईने प्रथम खेळताना 178 रन्स केले होते. या सामन्यात आरसीबीला 13 रन्सने गमावला. आयपीएलमध्ये चेन्नई आणि बेंगळुरूची टीम आतापर्यंत 31 वेळा आमनेसामने आले आहेत.
यांच्यातील सामने पहाता चेन्नईने 20 वेळा जिंकली आहे, त्यामुळे दोन्ही टीममध्ये सीएसकेचा वरचष्मा दिसून येतोय. तर आरसीबी केवळ 10 वेळा जिंकू शकली आहे. याशिवाय दोघांमधील सामन्याचा निकाल येऊ शकला नाही. 2009 मध्ये चेन्नईने बेंगळुरूचा 92 रन्सने पराभव केला होता. जो दोन्ही टीममधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय होता.
17 एप्रिल 2023 रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यात शेवटचा सामना गेला होता. त्या सामन्यात प्रथम खेळणाऱ्या चेन्नईने 226 रन्सचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. यावेळी दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करत लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरील 8 रन्सने त्यांचा पराभव झाला
CSK vs RCB संभाव्य प्लेइंग 11
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, महेश थेक्षाना.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, आकाश दीप, मोहम्मद सिराज.