IPL 2024 Chennai Super Kings Full Players List : मागील हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने विजेतेपदावर कब्जा केला होता. यंदाच्या हंगामात खेळणार असल्याची हमी धोनीने दिल्यानंतर आता चेन्नईच्या चाहत्यांच्या जीवात जीव आला आहे. धोनीची ही शेवटची आयपीएल असू शकते. अशातच आता धोनीने लिलावात मोठी चाल खेळली आहे. चेन्नईने अशा खेळाडूंना खरेदी केलंय, जे चेन्नईसाठी मोठे सामने जिंकवून देऊ शकतात. त्याचबरोबर चेन्नईच्या संघात आता युवा खेळाडूंची देखील भरती झाली आहे. (IPL 2024 Chennai Super Kings Players List)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईने युवा खेळाडूंना संघात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने एकीकडे रचिन रविंद्रला स्वस्तात खरेदी केलंय. तर आता टीम इंडियामध्ये अद्याप संधी न मिळालेल्या समीर रिझवी याला देखील ताफ्यात समावून घेतलंय. त्यामुळे आता चेन्नई नव्या दमाचा संघ उभारू लागला आहे. त्याचबरोबर धोनीसोबत एक फिनिशर देखील संघात घेतलंय, त्याचं नाव डॅरिल मिशेल... त्याला 14 कोटींची रक्कम मोजून करारबद्ध केलंय. तर गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये धोनीने अनुभवी खेळाडूवर विश्वास दाखवलाय. चेन्नईने मुस्तफिझूर रहमान याला बेस प्राईजवर म्हणजेच 2 कोटीमध्ये खरेदी केलंय.


CSK ने कायम ठेवलेले खेळाडू : 


अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, महेश तिक्षाणा, मथीशा पथिराना, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी, मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शेख रशीद, शिवम दुबे , सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे.


चेन्नई नवे सुपर किंग्ज


रचिन रवींद्र (Rachin Ravindra) - 1.8 कोटी
शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) - 4 कोटी
डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) - 14 कोटी
समीर रिझवी (Sameer Rizvi) - 8.40 कोटी
मुस्तफिझूर रहमान (Mustafizur Rahman) - 2 कोटी
अवनीश राव अरावेली (Avanish Rao Aravelly) - 20 लाख


CSK ने सोडलेले खेळाडू : आकाश सिंग, अंबाती रायुडू, बेन स्टोक्स, भगत वर्मा, ड्वेन प्रिटोरियस, काइल जेमिसन, सिसांडा मगला, सुभ्रांशु सेनापती.