IPL 2024 Make Dhoni Seat Outside Team CSK: रविवारी झालेल्या चेन्नई विरुद्ध पंजाब किंग्सदरम्यानच्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी चक्क 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. धरमशाला येथील मैदानावर झालेल्या सामन्यात पहिल्यांदाच धोनी त्याच्या टी-20 करिअरमध्ये 9 व्या क्रमांकावर खेळायला आला आणि शुन्यावर बाद झाला. अगदी तळाला खेळायला येण्याचा निर्णय धोनीच्या आणि सीएसकेच्याही अंगलट आल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्या पर्वात धोनी हा चेन्नईसाठी फिनिशरची भूमिका बजावत आहे.


हरभजन संतापला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी सामान्यपणे 1 ते 2 ओव्हर बाकी असताना फलंदाजीला येतो. मात्र पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने मिचेल सॅण्टनर आणि शार्दुल ठाकूर या दोन गोलंदाजांनाही आपल्या आधी फलंदाजीला पाठवलं. धोनी स्वत: 19 व्या ओव्हरला फलंदाजीसाठी आला आणि त्याने स्वत:चा फज्जा उडवून घेतला. पंजाबचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने धोनीला क्लिन बोल्ड केलं. यामुळे भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग चांगलाच संतापला आहे. धोनीचा हा निर्णय हरभजनला पटलेला नाही. कठोर शब्दांमध्ये त्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. 


..तर त्याने खेळूच नये


धोनी जर नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार असेल तर चेन्नईच्या संघाने त्याला बाहेर बसवून त्याच्याऐवजी एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवावा, असं स्फोटक सल्ला हरभजनने सीएसकेच्या व्यवस्थापनाला दिला आहे. "नवव्या क्रमांकावर फलंदाजीला यायचं असेल तर धोनीने चेन्नईकडून खेळूच नये. त्याच्याऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये एका वेगवान गोलंदाजाला खेळवलेलं परवडेल. तो स्वत: यासंदर्भातील निर्णय घेतो आणि त्याने वरच्या क्रमांकाला फलंदाजी न येण्याचा निर्णय घेत संपूर्ण संघाची निराशा केली," असं हरभजनने म्हटलं आहे. 


नक्की वाचा >> 'मागील काही वर्षांमध्ये...'; स्ट्राइक रेटमुळे T20 वर्ल्डकपमधून वगळल्यानंतर केएल राहुल स्पष्टच बोलला


त्याने हा निर्णय घेतला नाही हे शक्यच नाही


"शार्दुल ठाकूर त्याच्याआधी फलंदाजीला आला. ठाकूर कधीच धोनीप्रमाणे फटके मारु शकत नाही. धोनीने ही चूक का केली मला कळत नाही. त्याच्या परवानगी शिवाय (चेन्नईच्या संघात) काहीच होत नाही. तसेच मला हे ही मान्य नाही की त्याला खालच्या क्रमांकावर खेळायला पाठवण्याचा निर्णय तो सोडून इतर कोणी घेतला असेल," असं म्हणत हरभजनने धोनीला लक्ष्य केलं. "चेन्नईच्या संघाला वेगाने धावा करणं गरजेचं होतं. धोनीने यापूर्वीच्या सामन्यांमध्ये हे करुन दाखवलं आहे. पंजाबविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात तो फलंदाजीला न येता थांबून राहिला. आज चेन्नईचा विजय झाला असला तरी मी धोनीवर आज टीका करणार. लोकांना काहीही म्हणू द्या पण जे आहे ते आहे," असं हरभजनने 'स्टार स्पोर्ट्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.