CSK vs RR Ravindra Jadeja Controversy: रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. सीएसकेने 5 विकेट्सने राजस्थानचा पराभव केला. चेपॉक स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात राजस्थानने चेन्नईला दिलेल्या 142 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग 19 ओव्हर्समध्येच केला. मात्र यावेळी सीएसकेची फलंदाजी सुरु असताना एक अशी घटना घडली, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई सुपर किंग्ज फलंदाजी करत असताना एक घटना घडली ज्यामुळे वाद निर्माण झाला. चेन्नईचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाच्या विकेटवरून हा प्रकार घडला. याला 'फील्डमध्ये अडथळा आणल्याबद्दल' म्हणजेच ‘ऑब्सट्रक्टिंग द फील्ड’ प्रकरणी आऊट देण्यात आले. यानंतर प्रश्न उपस्थित होऊ लागला की, जडेजा खरोखरच आऊट आहे की नाही? दरम्यान याबाबत क्रिकेटचा नियम काय सांगतो ते पाहुया. 


कसा आऊट झाला रविंद्र जडेजा?


आवेश खान 16 व्या षटकात गोलंदाजी करायला आला होता. यावेळी  जडेजा आणि ऋतुराज गायकवाड फलंदाजी करत होते. ओव्हरच्या पाचव्या बॉलवर जड्डूने शॉट थर्ड मॅनच्या दिशेने मारला आणि वेगाने रन काढण्यासाठी धावला. अशात दोन धावा पूर्ण होतील, असं जड्डूला वाटत होतं. जडेजाने पहिली धाव जोरात घेतली अन् दुसरी धाव घेण्यासाठी पळाला. तेवढ्यात ऋतुराजने दुसरी धाव न घेण्याचा कॉल दिला. जड्डूची तारंबळ उडाली. तो पुन्हा मागे फिरला अन् नॉन स्ट्राईक इन्डकडे धावला. मात्र, जड्डू स्टंप अडवून धावला अन् त्याचवेळी विकेटकिपर संजूने नॉन स्ट्राईक इन्डच्या दिशेने थ्रो केला. बॉल जडेजाच्या पाठीला लागला. त्यावेळ राजस्थानच्या खेळाडूंनी आऊटसाठी अपिल केलं अन् अंपायरने मैदानात अडथळा आणल्याबद्दल जडेजाला बाद घोषित केलं. 


काय सांगतो क्रिकेटचा नियम?


या सामन्यात आऊट दिल्यानंतर रविंद्र जडेजा संतापला. यावेळी रागाच्या भरात पॅव्हेलियनमध्ये परतला. आता प्रश्न असा आहे की जडेजाला बाद देण्याता निर्णय योग्य होता की नाही. कोणत्या नियमानुसार त्याला जडेजाला बाद देण्यात आलं? मॅरिलेबोन क्रिकेट क्लबचा नियम 37.1 नुसार, जर चेंडू अजूनही बाद झाला नसेल आणि फलंदाजी किंवा गोलंदाजी टीममधील कोणीही कोणत्याही कृतीने जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला तर त्याला बाद घोषित केले जाईल.