IPL 2024 KKR vs DC : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2024) आज (3 April) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना रंगणार आहे. विशाखापट्टणम येथे दोन्ही संघ आमनेसामने असतील. तसेच हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरु होईल. या सामन्यापूर्वी हेड टू हेड आणि संभाव्य प्लेईंग 11 काय असेल जाणून घेऊया... 


हेड टू हेड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये दिल्ली आणि कोलकाता यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. आतापर्यंत दोघांमध्ये एकूण 32 सामने खेळले असून कोलकाताने 16 आणि दिल्लीने 15 सामने जिंकले आहेत. विशाखापट्टणममध्ये येथे दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांचा सध्याचा फॉर्म पाहता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरचा वरचष्मा दिसून येतो.  विशेषत: केकेआरचे फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत, ते लक्षात घेता ऋषभ पंतसाठी एकप्रकारचे आव्हानत्मक स्पर्धा असणार आहे. 


2023 - दिल्ली कॅपिटल्स 4 गडी राखून विजयी


2022 - दिल्ली कॅपिटल्स 4 गडी राखून विजयी


2022 - दिल्ली कॅपिटल्स 44 धावांनी विजयी


2021 - कोलकाता नाईट रायडर्सचा 3 गडी राखून विजय


2021 - कोलकाता नाईट रायडर्सचा 3 गडी राखून जिंकला


केकेआर अव्वल स्थान गाठणार का?


श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवून त्यांना गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवण्याची संधी आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला आणि गुणवत्ता यादीत अव्वल स्थान पटकवू शकतात. तथापि, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा नेट रनरेट सध्या खराब आहे. 


अशी असेल विशाखापट्टणमची खेळपट्टी


विशाखापट्टणमच्या खेळपट्टीवर सहजपणे धावा करणे शक्य आहे. मात्र या खेळपट्टीवर गोलंदाजांना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे हे दोन्ही संघ गोलंदाज करताना आव्हानाला कसे सामोरे जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


या मैदानावर आतापर्यंत 14 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 7 सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या डावात फलंदाजी  करणाऱ्या संघाने 7 सामन्यात विजय मिळवला  आहे.


दिल्ली कॅपिटल्स संभाव्य इलेव्हन


पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), मिचेल मार्श, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, मुकेश कुमार, खलील अहमद.


कोलकाता नाइट रायडर्स संभाव्य इलेव्हन


फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा.