Mumbai Indians IPL 2024 Time Table : लोकसभा निवडणुकीमुळे रखडलेलं आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक (IPL 2024 Full Schedule) आता समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केलं होतं. मात्र, आता स्टार स्पोर्ट्सने उर्वरित वेळापत्रक जाहीर केलं आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला येत्या 8 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) वेळापत्रक तुम्ही पाहिलंय का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईने पहिला सामना गमावला


मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईला पराभवाची धुळ चाखावी लागली. पहिला सामना गमावून हार्दिक पांड्याने रोहित शर्माची मागील 11 वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचं प्रदर्शन कसं असेल? असा सवाल विचारला जात आहे.


मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रक


24 मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, अहमदाबाद
27 मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, हैदराबाद
1 एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, मुंबई
7 एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, मुंबई
11 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, मुंबई
14 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, मुंबई
18 एप्रिल - पंजाब किंग्ज वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, मोहाली
22 एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, जयपूर
27 एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, दिल्ली
30 एप्रिल - लखनऊ सुपर जाएन्ट्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, लखनऊ
3 मे - कोलकाता नाईट रायडर्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, मुंबई
6 मे - सनरायझर्सं हैदराबाद  वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, मुंबई
11 मे - कोलकाता नाईट रायडर्सं वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, कोलकाता
17 मे - लखनऊ सुपर जाएन्ट्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, मुंबई.



मुंबई इंडियन्स संघ - रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, विष्णू विनोद, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, देवाल्ड ब्रेविस, क्वेना माफाका, नमन धीर.