IPL 2024 GT vs DC: शुभमन गिल की ऋषभ पंत कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
ipl 2024 GT vs DC Today Playing XI: आज (17 एप्रिल 2024) आयपीएलच्या 32 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने असणार आहे. आजच्या सामन्यात कोण बाज मारणार? चला जाणून घेऊया या सामन्याचा खेळपट्टीचा अहवाल आणि हेड टू हेड आकडेवारी...
IPL 2024 GT vs DC head to head in Marathi: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या आज (17 एप्रिल) 32 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमनेसामने असणार आहे. आजचा हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे. भारतीय क्रिकेटच्या दोन युवा कर्णधारांमध्येही ही टक्कर असेल. आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या गुजरात-दिल्ली या सामन्यापूर्वी या दोन्ही संघांची गुणतालिकेत कोणत्या क्रमाकांवर आहेत ते जाणून घेऊया... शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली असणारी गुजरात टायटन्सने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत ज्यात त्यांनी 3 सामने जिंकले आहेत. तर 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये गुजरात सहाव्या स्थानावर आहेत.
तर दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएलच्या या स्पर्धेत आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत ज्यात त्यांना फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. तर चार सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. एकंदरित दिल्ली संघ 4 गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. आज हे दोन्ही संघ सामना जिंकून गुणतालिकेतील आपले स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करताना दिसतील.
हेड टू हेड आकडेवारी
गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आतापर्यंत तीन वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये दोनवेळा गुजरातने विजय मिळवला तर दिल्लीने एका मॅचमध्ये विजय मिळवला आहे.
अशी असेल खेळपट्टी
नरेंद्र मोदी स्टेडियमची विकेट फिरकी गोलंदाजीला मदत करण्यासाठी ओळखली जाते. गेल्या काही वर्षांत वनडेमध्ये सरासरी धावसंख्येचा दर प्रति षटक 5 धावांपेक्षा कमी आहे. दरम्यान अलिकडच्या वर्षांत विशेषतः आयपीएल दरम्यान, ट्रॅक वेगवान झाला आहे आणि धावा काढण्यास मदत झाली आहे.ट
असं असेल हवामान
आज अहमदाबादमधील हवामान उष्ण राहिल. दिवसभर उष्णता राहणार नसून पावसाची शक्यता नाही. आज अहमदाबादमध्ये कमाल तापमान 42 अंश सेंटीग्रेडपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. किमान तापमान 28 अंश सेंटीग्रेडपर्यंत राहू शकते.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11
गुजरात टायटन्स (GT) संभाव्य प्लेईंग 11: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, मॅथ्यू वेड (wk), अजमतुल्ला ओमरझाई, अभिनव मनोहर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद
दिल्ली कॅपिटल्स (DC) संभाव्य प्लेईंग 11: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.