GT vs PBKS Playing 11 Head to Head : आयपीएल 2024 मधील 17 व्या सामन्यात आज, 4 एप्रिल रोजी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. या मैदानावर आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत.  त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही होमग्राउंडचा फायदा घेण्यासाठी गुजरात आतुर असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांपैकी एकूण 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे 4 गुण आणि -0.738 इतका नेट रनरेट आहे. तर पंजाबने तीन सामन्यांत केवळ एकच सामना जिंकला असून दोन दुहेरीची कमाई केली आहे. तर रन रेट +0.337 आहे. गुजरातने पहिल्या सामन्यात मुंबईला 6 धावांनी पराभूत केले होते. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांनी आतापर्यंत तीन आयपीएल सामने खेळले आहेत. पंजाबवर गुजरातचा वरचष्मा आहे. कारण गुजरातने पंजाब विरुद्ध दोन मॅच जिंकल्या आहेत आणि पंजाबने 1 मॅच जिंकली आहे. गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जविरुद्ध आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक धावा 190 आहेत आणि पंजाबने गुजरात टायटन्सविरुद्ध केलेल्या सर्वाधिक 189 धावा आहेत. 


शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स सध्या 3 पैकी 2 सामने जिंकून IPL 2024 गुणतालिकेत 5 व्या स्थानावर आहे. आज जर गुजरात पंजाबला पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचतील. तर 3 सामन्यांत 2 गुणांसह 7व्या स्थानावर असलेला पंजाब किंग्स गुजरात टायटन्सचा पराभव केल्यास 5व्या स्थानावर पोहोचू शकतो. 


नरेंद्र मोदी स्टेडियमवरील आकडेवारी-


एकूण सामने - 29
प्रथम फलंदाजी करताना जिंकलेले सामने – 14
नंतर फलंदाजी करताना जिंकलेले सामने – 15
नाणेफेक जिंकल्यानंतर जिंकलेले सामने – 13
नाणेफेक गमावल्यानंतर जिंकलेले सामने – 16
सर्वोच्च संघ स्कोअर- 233/3
सर्वात कमी संघाचा स्कोअर- 102
पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या- 172
पाठलाग करताना सर्वोच्च धावसंख्या - 205 


दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11


गुजरात टायटन्स संभाव्य प्लेईंग 11 : शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, दर्शन नळकांडे, नूर अहमद


पंजाब किंग्ज संभाव्य प्लेईंग 11 :  शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, राहुल चहर