IPL 2024 KKR vs LSG head-to-head In Marathi :  इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या 28 व्या सामन्यात आज (14 एप्रिल ) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध (KKR) लखनऊ सुपर जायंट्स (LSG) सामना रंगणार आहे. हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथील मैदानावर दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. आजच्या सामन्यात केकेआरचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे तर केएल राहुल एलएसजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या सामन्यात केकेआरला घरच्या मैदानावर जिंकण्याची संधी आहे तर एलएसजीचा पॉईंट टेबलमध्ये अव्वल क्रमांक गाठण्याचा प्रयत्न असणार आहे. आजचा सामना खेळण्यासाठी खेळपट्टी कशी असले? हवामानाचा अंदाज कसा असेल? तसेच आतापर्यंत कोणता संघ वरचढ आहे? जाणून घेऊया... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामात आज म्हणजेच 14 एप्रिल (रविवार) क्रिकेटप्रेंमीना डबल हेडर पाहायला मिळणार आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. तसेच कोलकाताने आतापर्यंत एकूण 4 सामने खेळले असून 3 सामन्यात विजय मिळवला आहे तर 1 सामना गमावला आहे. सध्या पॉईंट टेबलमध्ये KKR संघ 6 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर लखनऊने आतापर्यंत 5 सामने खेळले असून LSG ने 3 सामने जिंकले तर 2 सामने गमावले आहेत. सध्या आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये लखनऊ 6 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. एकंदरित आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


अशी असेल खेळपट्टी


कोलकातामधील ईडन गार्डन्स मैदानावरील खेळपट्टी फलंदाजांसाठी जास्त फायदेशीर ठरेल.  या मैदानावर वेगवान आउटफिल्डमुळे धावा जास्त संख्येने होतात. या खेळपट्टीवर चेंडू चांगला उसळी घेऊन बॅटवर येतो. अशा स्थितीत फलंदाजांना वेग आणि धावा घेणं शक्य होतो. . त्यामुळे त्याचवेळी वेगवान गोलंदाजही नव्या चेंडूने विकेट घेऊ शकतात. या मैदानावर फिरकी गोलंदाजांना मदत कमी आहे असे दिसते परंतु ते जुन्या चेंडूने विकेट्स देखील घेऊ शकतात. 


दोन्ही संघांची हेडू टू हेड आकडेवारी


आयपीएलच्या आतापर्यंतच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स पूर्णपणे कोलकाता नाईट रायडर्सवर वर्चस्व गाजवत आहेत. या दोघांमध्ये आतापर्यंत एकूण 3 सामने झाले आहेत. लखनऊ हे तिन्ही सामने जिंकले आहेत. केकेआर संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. एलएसजीविरुद्ध केकेआरची सर्वोच्च धावसंख्या 208 आहे. तर, केकेआरविरुद्ध एलएसजीची सर्वोत्तम धावसंख्या 210 धावा आहे.


कोलकात विरुद्ध लखनऊ


खेळलेले सामने: 1
लखनऊ सुपर जायंट्स : 1
कोलकाता नाईट रायडर्स: 0


लखनऊ विरुद्ध कोलकाता


खेळलेले सामने: 00
लखनऊ सुपर जायंट्स: 00
कोलकाता नाईट रायडर्स: 00


एकूण खेळलेले सामने: 3


लखनऊ सुपर जायंट्स जिंकले: 3
कोलकाता नाइट रायडर्स विजयी: 0


दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11 


कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य प्लेईंग 11  : फिलिप साल्ट, सुनील नरेन, श्रेयस अय्यर (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, वैभव अरोरा, हर्षित राणा, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती.


लखनऊ सुपर जायंट्स संभाव्य प्लेईंग 11 : क्विंटन डी कॉक, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव.