`...तोपर्यंत मला पप्पा बोलायचं नाही,` सुनील शेट्टीने के एल राहुलला खडसावलं, VIDEO व्हायरल
IPL 2024: आयपीएल स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यादरम्यान ड्रीम 11 च्या जाहिरातींनी क्रिकेटरसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका जाहिरातील के एल राहुल आपले सासरे सुनील शेट्टीसह झळकला आहे.
IPL 2024: आयपीएल स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. 22 मार्चला चेन्नई आणि बंगळुरु यांच्यात पहिला सामना होणार असून, यासह स्पर्धेला सुरुवात होईल. दरम्यान त्याआधी संघ एकमेकांविरोधात रणनीती आखताना दिसत आहेत. आतापर्यंत एकमेकांसह खेळणारे हे खेळाडू आता मैदानात एकमेकाला कडवी झुंज देताना दिसतील. दरम्यान सामन्याआधी मैदानाबाहेरही खेळाडू जाहिरातींमधून आमने-सामने आले आहेत. एका जाहिरातीत के एल राहुल आपले सासरे सुनील शेट्टीसह झळकला आहे.
आयपीएलच्या निमित्ताने सध्या ड्रीम 11 च्या जाहिरातींनी क्रिकेटरसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामधील एका जाहिरातील के एल राहुल आपले सासरे सुनील शेट्टीसह झळकला आहे. या जाहिरातीतल सुनील शेट्टी जावयाला पाठिंबा देण्याऐवजी मुंबई इंडियन्सचं समर्थन करताना दिसत आहे. यानंतर के एल राहुलनेही आपण याचा बदला घेऊ असा इशारा दिला आहे.
के एल राहुलने शेअर केला व्हिडीओ
के एल राहुलने एक्सवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. ड्रीम 11 च्या जाहिरातीच्या व्हिडीओत सुनील शेट्टी आणि रोहित शर्मा एकत्र डिनर करताना दिसत आहेत. त्याचवेळी के एल राहुल तिथे येतो. पण रोहित शर्मा त्याला बसण्यापासून रोखतो आणि फॅमिली डिनर सुरु असल्याचं सांगितलं. के एल राहुल आश्चर्यचकित होतो आणि सुनील शेट्टीकडे पाहून 'पापा' अशी हाक मारतो.
यावर सुनील शेट्टी के एल राहुलला रोखतो आणि 'जोपर्यंत स्पर्धा सुरु आहे तोपर्यंत पापा नाही म्हणायचं. शर्माजींचा मुलगा माझा मुलगा' असं खडसावतो. यानंतर सुनील शेट्टी आपल्या हाताने रोहित शर्माला भरवतो.
के एल राहुलने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "येथेही शर्माजींच्या मुलानेच सगळं नेलं. याचा बदला मी नक्की घेईन". हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
रोहित शर्मा कर्णधारपदी नाही
रोहित शर्मा यावेळी मुंबई इंडियन्सकडून फक्त फलंदाज म्हणून खेळणार आहे. कर्णधारपदाची जबाबदारी यावेळी हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. रोहित शर्माने मुंबईला पाचवेळा चॅम्पियन्स केल्यानंतरही संघ व्यवस्थापनाने हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवलं. हार्दिक मागील हंगामात गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. त्याने दोनपैकी एका हंगामात संघाला विजेतेपद मिळवून दिलं आणि दुसऱ्यात अंतिम सामन्यापर्यंत नेलं.
मुंबई इंडियन्सने लिलिवाच्या संध्याकाळीच हार्दिक पांड्याला ताफ्यात घेतलं होतं. ट्रेड करत त्यांनी हार्दिकला संघात घेतलं आणि थेट कर्णधारपद सोपवलं. पण हार्दिक पांड्याला कर्णधार करणं मुंबईच्या चाहत्यांना आवडलेलं नाही. या निर्णयावरुन फार टीका होत आहे.