IPL चे सामने अधिक होणार रोमांचक; 2027 पर्यंत BCCI लीगमध्ये करणार `हा` मोठा बदल
IPL 2024 News in Marathi : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. 2027 पर्यंत आयपीएलचे सामने अधिक रोमांचक होणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे तुम्ही आता सलग तीन महिने आयपीएलचा हंगामा बघू शकणार आहे.
IPL 2024 Latest News in Marathi : येत्या 22 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात होणार आहे. आयपीएलचा हा हंगामा सलग दोन महिने सुरु राहणार असून क्रिकेटप्रेमींचे मनोरंजन होणार आहे. त्यातच आता बीसीसीआयकडून आयपीएल हंगामात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. यामुळे तुम्हाला भविष्यात आयपीएल तीन महिने पाहता येणार आहे.
आयपीएलचा महासंग्राम दोन महिने रंगणार आहे. त्यातच आता आयपीएलच्या आगामी हंगामात सामन्यांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे. बीसीसीआयकडून 2027 पर्यंतच्या आयपीएल हंगामात 94 सामने खेळवण्यात येतील असे संकेत देण्यात आले आहेत. आयपीएल 2022 मध्ये एकूण 74 सामने खेळण्यात आले. आतापर्यंतच्या ही सर्वात मोठी संख्या होती. मात्र त्यानंतर 2023 मध्ये ही 74 सामने खेळवण्यात आले. यंदा ही 22 मार्च 2024 पासून सुरु होणारी आयपीएलचे 74 सामने असणार आहेत. असे असतानाही बीसीसीआय प्रत्येक दोन हंगामानंतर आयपीएलच्या सामन्यांमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहे.
आयपीएलमध्ये मिडीया अधिकार खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्या कंपन्यांना बीसीसीआयने सामन्यांमध्ये वाढ करणार असल्याची माहीती दिली आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या कंपन्यांच्या लिलावामध्ये वाढ होईल. तसेच अधिक सामने असल्यामुळे माध्यमांवर सार्वाधिक जाहिराती उपलब्ध होतील आणि कमाईसुद्धा वाढेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे सर्व कंपन्या आयपीएलचे मीडिया अधिकार खरेदी करण्यासाठी अधिक बोली लावतील. याचा फायदासुद्धा बीसीसीआयला मोठा प्रमाणात होईल.
बीसीसीआयने 2023 आणि 2024 च्या हंगामामध्ये 74 आयपीएल सामने खेळवण्याचा निर्णय घेतला. 2025 आणि 2026 हंगामात 84 सामने होणार आहेत. तर 2027 हंगामात 10 संघांमध्ये 94 सामने होतील. त्यानंतर एक संघ लीग टप्प्यात 18 सामने खेळतील तसेच 4 प्लेऑफसह एकूण 94 सामने होतील. आयपीएलचे 74 सामने 59 दिवसांत होतात, म्हणजेच हे सामने सुमारे 2 महिने चालतात. जर एका मोसमात 94 सामने खेळले गेले तर हा हंगाम सुमारे 75 दिवस म्हणजे अडीच महिने तरी आयपीएलचा सामना चालणार आहे.