IPL 2024, RR v GT : राजस्थान की गुजरात? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
RR v GT head to head : आज राजस्थान आणि गुजरात हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
IPL 2024, RR v GT overall head-to-head : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील आजचा 24 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सशी यांच्यात होणार आहे. संजू सॅमसन की शुभमन गिल यांच्यातील सामना कोण जिंकणार? हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. दरम्यान संजू सॅमसनचा विजयरथ रोखण्याचं आव्हान शुभमन गिलच्या समोर असेल.
आयपीएलच्या आतापर्यंत चार सामन्यात राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला आहे. या विजयामुळे राजस्थान गुणतालिकेत ही पहिल्या स्थानावर विराजमान आहे. दुसरीकडे गुजरातने पाच सामन्यात फक्त दोन विजय मिळवले असून गुजरातचा संघ सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे आज (10 एप्रिल) गुजरातचा संघ तिसऱ्या विजयासाठी मैदानावर आहे. चला तर मग जाणून घेऊया, आजच्या सामन्यात खेळपट्टी कशी असले, हवामानाचा अंदाज काय असेल. तसेच हेड टू हेड , पाहा दोन्ही संघाचे संभाव्य प्लेईंग 11...
हेड टू हेड आकडेवारी
घरच्या मैदानावर गुजरातविरुद्धचा विक्रम करण्यासाठी राजस्थान उत्सुक आहे. दोन्ही संघांची आकडेवारी पाहता गुजरातच्या संघाचे पारडे जड दिसत आहे. गुजरातने राजस्थानविरुद्ध चार विजय मिळवले आहेत. त्याचवेळी, राजस्थानचा गुजरातकडून एका सामन्यात पराभव झाला आहे. गुजरात आणि राजस्थान संघाचा आतापर्यंत पाच वेळा आमनासामना झाला. तर आयपीएलच्या मागील सामन्यात गुजरात आणि राजस्थान संघांमध्ये दोनवेळा लढत झाली होती. ज्यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात गुजरातने 9 गडी राखून, तर दुसऱ्या सामन्यात राजस्थानने तीन विकेट राखून विजय मिळवला. पण 2022 मध्ये गुजरातने तिन्ही सामने जिंकले असते.
अशी असेल खेळपट्टी
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमच्या खेळपट्टीवर गोलंदाजासाठी जास्त फायदेशीर ठरेल. याशिवाय हे मैदान मोठे आहे, त्यामुळे फलंदाजांना सीमारेषा ओलांडणे सोपे जाणार नाही. या खेळपट्टीवर, संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करतात. वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त फिरकीपटूंना खेळपट्टीची मदत मिळते. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 161 धावांची आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11
राजस्थान रॉयल्सचे संभाव्य प्लेइंग 11 - यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्जर, आवेश खान आणि युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्सचे संभाव्य प्लेइंग 11 - शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, केन विल्यमसन, बीआर शरथ (यष्टीरक्षक), विजय शंकर, दर्शन नळकांडे, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन आणि नूर अहमद.