जय श्री राम… राजस्थान रॉयल्सच्या `रामभक्त` खेळाडूला भेटल्यावर ईशान किशनने दिला नारा... Video व्हायरल
IPL 2024 : मुंबई आणि राजस्थान आज आयपीएलमध्ये आमने सामने येणार आहेत. त्याआधी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला. यादरम्यान मुंबई इंडियन्सचा विकेटकिपर-फलंदाज ईशान किशन आणि राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज केशव महाराजची भेट झाली. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
IPL 2024 : आयपीएलच्या 38 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) आणि राजस्थान रॉयल्स (RR) आमने सामने आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. राजस्थान रॉयल्सचं हे होम ग्राऊंड आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्ससमोर आव्हान असणार आहे. आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये (IPL Play Off) आपलं स्थान टिकवण्यासाठी मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकावा लागणार आहे. हिटमॅन रोहित शर्मा आणि ईशान किशन मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात करतील. यंदाच्या हंगामात मुंबईचा विकेटकिपर-फलंदाज ईशान किशनला अद्याप म्हणावा तसा सूर गवसलेला नाही.
ईशान किशनचा व्हिडिओ व्हायरल
आता राजस्थान विरुद्धच्या सामन्यात ईशान किशनची बॅट तळपणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान ईशान किशनचा (Ishan Kishan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ सवाई मानसिंग स्टेडिअमवर सराव करत असताना ईशान किशन आणि राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज केशव महाराज यांची भेट झाली. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ईशान किशनने म्हटलं जय श्री राम
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फिरकी गोलंदाज केशव महाराज यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतोय. मुंबईविरुद्धच्या सामन्यातही राजस्थाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. या सामन्याच्या सरावादरम्यान ईशान किशन आणि युजवेंद्र चहल आपापसात गप्पा मारत उभे होते. यावेळी राम भक्त केशव महाराज त्या ठिकाणी आला. त्याने ईशान किशनशी हात मिळवला. त्यानंतर ईशान किशनने केशव महाराजला आता तुला हिंदी कळतं का असा प्रश्न विचारला. यावर केशव महाराजने थोडंथोडं कळतं असं उत्तर दिलं. यावर ईशान किशनने केशव महाराजला जय श्री राम केलं.
ईशान किशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.
मुंबईसाठी विजय महत्त्वाचा
आयपीएल पॉईंटटेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सचा सामना पॉईंटटेबलमध्ये सातव्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सशी सामना आहे. राजस्थान रॉयल्सकडे सात सामन्यात 12 पॉईंट जमा आहेत. तर मुबंई इंडियन्सकडे सहा पॉईंट आहेत. प्लेऑफमध्ये आपलं स्थान टिकवण्यासाठी मुंबई इंडियन्सला या सामन्यात विजय महत्त्वाचा आहे.