MI vs RR: `आम्ही 150-160 धावा करणार होतो पण...`, मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने कोणाला धरले जबाबदार?
Hardik Pandya: मुंबई इंडियन्सच्या वाटेला सलग तिसरा पराभव आला आहे. यामुळे पाचवेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सच्या फॅन्सचा हिरमोड झाला. राजस्थान रॉयल्सने 27 चेंडू राखून पराभव केल्याने रनरेटवरही फरक पडला आहे. या पराभवाचं कारण देत मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितले की...
Hardik Pandya Statement In Marathi : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा सलग तिसऱ्यांदा परभवाला सामोरे जावं लागलं. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर 6 गडी राखून पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्सची सुरुवात नाणेफेकच्या नकारात्मकने झाली होती. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकार लगावत 125 धावा केल्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने 27 चेंडू आणि 6 गडी राखून आव्हान पूर्ण केले. मुंबईने पहिल्या 4 विकेट्समध्ये केवळ 20 धावा गमावले होते. रोहित शर्मा, नमन धीर, देवाल्ड ब्रेविस यांना खाते उलगडता आले नाही. तर हार्दिक पांड्याने 21 चेंडूत 6 चौकारांसह 34 धावा केल्या. राजस्थानविरुद्धच्या या पराभवानंतर हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सचा का पराभव झाला याचे कारण त्याने दिले...
मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, "होय, एक कठीण रात्र, आम्हाला हवी तशी सुरुवात करायला मिळाली नाही. मला पलटवार करायचा होता, आम्ही 150-160 धावा करण्याच्या चांगल्या स्थितीत होतो, पण माझ्या विकेट्समुळे सामना महागात पडला. मी थोडी चांगली कामगिरी करायली हवी होती. अशा खेळपट्टीचीही अपेक्षा नव्हती. गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टी होती. कधी कधी निकाल आपल्या बाजूने असतो तर कधी नसतो. एक संघ म्हणून आम्हाला वाटतं की, आम्ही खूप चांगलं करु शकतो पण आम्हाला शिस्तबद्ध होण्याची आणि धाडस दाखवण्याची गरज आहे.
त्याचवेळी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन म्हणाला, “मला वाटते की नाणेफेक हा गेम चेंजर होता. बोल्ट आणि बर्गरच्या अनुभवाने आम्हाला मदत केली. 4-5 विकेट्स मिळतील असे वाटले नव्हते. पण आमचे गोलंदाज चांगली कामगिरी करतील याची आम्हाला कल्पना होती.”
दरम्यान मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून अवघ्या 6 धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. तर हैदराबाद सनरायजर्सने 31 धावांनी हरवलं होतं. मुंबईच्या विजयासाठी आणखी एका समन्याची वाट पाहावी लागणार आहे. मुंबईचा पुढचा सामना दिल्ली कॅपिटल्ससोबत आहे. 7 एप्रिलला म्हणजेच रविवारी वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे. त्यानंतर 11 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामना होणार आहे. हे सामने वानखेडे स्टेडियमवर असतील. या सामन्यात नानेफेकीचा कौल खऱ्या अर्थाने महत्त्वाचा ठरणार आहे.