Dhoni Leaves CSK In Tears: धक्कातंत्र म्हटलं की भारतीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीचं नाव आवर्जून घेतलं जातं. अगदी 2007 मध्ये अनपेक्षितपणे देशाला पहिलाच टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणं असो किंवा 2015 मध्ये अचानक कसोटीमधून निवृत्ती जाहीर करणं असो किंवा 2019 मध्ये थेट अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेणं असो या साऱ्या गोष्टी अचानकच घडल्या. यापैकी पहिली गोष्ट वगळता बाकी साऱ्या धोनीच्या चाहत्यांना धक्का देणाऱ्या ठरल्या. असाच एक धक्का त्याने आता आयपीएल 2024 पूर्वी आपल्या चेन्नई सुपर किंग्जमधील सहकऱ्यांना दिला. 


तेव्हा प्रत्येकजण रडत होता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीने चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधार पद सोडत असल्याची घोषणा अचानक केल्याने संघातील अनेकांना धक्का बसला. आयपीएलच्या 17 व्या पर्वाला 22 मार्च रोजी सुरुवात झाली. मात्र 22 च्या पूर्वसंध्येलाच चेन्नईच्या संघाने आणि धोनीने चाहत्यांना एक मोठा धक्का दिला. चेन्नईने सोशल मीडिया अकाऊंटवरुन अचानक धोनीऐवजी ऋतुराज गायकवाड संघाचा कर्णधार असेल असं जाहीर केलं. मात्र नेतृत्वबदलाची ही केवळ एक पोस्ट ठरली तरी हा निर्णय धोनीचं आयपीएल करिअर संपण्याची सुरुवात असल्याचं चाहत्यांना कळून चुकलं. अनेकांनी याची कल्पना होती मात्र तरीही हा निर्णय धक्कादायक आहे, असं म्हणत भावना व्यक्त केल्या. चाहत्यांइतकाच मोठा धक्का धोनीच्या सहकाऱ्यांना बसल्याची माहिती चेन्नईच्या संघाचा प्रशिक्षक असलेल्या स्टीफन फ्लेमिंगने दिली आहे. धोनीच्या घोषणेनंतर ड्रेसिंगरुममधील प्रत्येकजण भावूक होऊन रडत होता असंही फ्लेमिंगने सांगितलं.


आम्ही तयार नव्हतो


चेन्नईच्या संघाला धोनीने केलेली घोषणा ऐकून धक्का बसल्याचं फ्लेमिंग म्हणाला. कर्णधारपद सोडण्याचा निर्णय हा पूर्णपणे धोनीचाच होता असंही फ्लेमिंगने स्पष्ट केलं. मात्र या एका निर्णयामुळे सर्वच उपस्थित लोक भावूक झाल्याचं फ्लेमिंगने सांगितलं. ऋतुराजच्या नेतृत्वाखाली संघ उत्तम कामगिरी करेल अशी अपेक्षा फ्लेमिंगने व्यक्त केली. पण त्यापेक्षाही अनेकांना अधिक दु:ख धोनी पायउतार होत असल्याचं झाल्याचं प्रशिक्षकाने सांगितलं. "(धोनीने ही घोषणा केली तेव्हा) सर्वचजण फार भावूक झाले. अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यावेळेस ड्रेसिंग रुममध्ये अशी एकही व्यक्ती नव्हती जिच्या डोळ्यात पाणी नव्हतं. सर्वचजण भावूक झाले. यापूर्वी जेव्हा संघाने (कर्णधार बदलला होता) तेव्हा आम्ही धोनी इतके (मानसिक दृष्ट्या) नेतृत्वबदलासाठी तयार नव्हतो," असं फ्लेमिंग म्हणाला.


नक्की वाचा >> CSK मध्ये वाद? ऋतुराजला कर्णधार केल्याने जडेजा नाराज? कोच फ्लेमिंग म्हणतो, 'ऋतुराज नक्कीच त्याची..'


ऋतुराजच का?


"धोनीने ऋतुराजकडे कर्णधारपद सोपवल्यानंतर जवळपास सर्वांनीच लगेच ऋतुराजचं अभिनंदन केलं. तो फार बडबड करणाऱ्यांपैकी नाही. मात्र त्याच्याकडे संघाला योग्य दिशेने घेऊन जाण्याची क्षमता आहे," असंही फ्लेमिंगने नव्या कर्णधाराबद्दल बोलताना स्पष्ट केलं. ऋतुराजची निवड कर्णधार म्हणून का करण्यात आली याबद्दल बोलताना फ्लेमिंगने, "ऋतुराजमध्ये फार आत्मविश्वास आहे. तो एक आश्वासक चेहरा आहे. तो एका चांगल्या दृष्टीकोनातून संघ सहकाऱ्यांकडे पाहतो. त्याच्याबद्दल संघातील सर्वच सदस्यांना आदर वाटतो," असं सांगितलं.


नक्की वाचा >> गंभीरचं कौतुक ऐकून गावसकर संतापले! थेट नाव घेत म्हणाले, 'पुढील काही सामन्यांमध्ये...'


आधीही चेन्नईने बदलेला कर्णधार


2 वर्षांपूर्वी चेन्नईच्या संघाने अशाच प्रकारे नेतृत्व बदल केला होता. रविंद्र जडेजाकडे धोनीचा उत्तराधिकारी म्हणून कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. त्यावेळी निकाल संघाच्या बाजूने लागत नव्हते.