IPL 2024 : महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा... क्रिकेटच्या जगतातील तीन अनभिषिक्त सम्राट. क्रिकेट जगतातील महान खेळाडू. खेळाडू आणि कर्णधार म्हणून या तिघांचं भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचं योगदान आहे. इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलमध्येही या तिघांनी गेली 16 वर्ष आपल्या कामगिरीने वेगळी छाप उमटवली आहे. पण आयपीएलच्या सतराव्या हंगामात या युगाचा अंत झाला आहे. या हंगामात एमएस धोनी, रोहित शर्मा किंवा विराट कोहील यापैकी एका कडेही कर्णधारपद नाहीए. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमएम धोनी कर्णधारपदावरुन पायउतार
2008 साली आयपीएलमध्ये धोनीच्या कर्णधार युगाची सुरुवात झाली. याच्या दोन वर्षानंतर धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखआली सीएसकेने (CSK) सलग दोन वेळा जेतेपद पटकावलं. एकीकडे धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपवला. तर दुसरीकडे आयपीएलमध्ये त्याने एक अशी उंची गाठली की तब्बल 16 वर्ष तो चेन्नईचा कर्णधारपदी कायम राहिला. आपल्या कारकिर्दीत धोनीने तब्बल पाचवेळी चेन्नईला जेतेपद मिळवून दिलं. 2023 मध्ये धोनीने चेन्नईला पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली. पण 2024 च्या सुरुवातीलाच धोनी कर्णधारपदावरुन पायउतार झाला. चेन्नईची कमान युवा ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवण्यात आली. 


विराटकडेही कर्णधारपद नाही
विराट कोहलीच्या कर्णधारपदाचा प्रवासही आकर्षक होता. कर्णधार म्हणून विराट कोहलीला (Virat Kohli) एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. पण त्यांच्या नेतृत्वात संघाने अनेक ऐतिहासिक विजयाची नोंद केली. विराटने वैयक्तिकही अनेक विक्रम नावावर केलेत. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत तो सचिन तेंडुलकरनंतर दुसरा फलंदाज आहे. पण 2021 मध्ये विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक-एक करत सर्व फॉर्मेटमधून कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाच्या कर्णधारपदावरुनही तो बाजूला झाला. 


रोहितच्या कर्णधारपदावरुन वाद
आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma). 2013 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. यानंतर मुंबई इंडियन्सचा (MI) पूर्ण चेहरामोहराच बदलला. रोहितच्या नेृतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तब्बल पाच जेतेपद पटकावली. पण 2024 आयपीएल हंगामाची सुरुवातच रोहितसाठी धक्कादायक ठरली. मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने रोहित शर्माला हटवतं गुजरात टायटन्समधून आलेल्या हार्दिक पांड्याला मुंबईचं कर्णधार बनवलं. 


दिग्गज कर्णधारांचं युग संपलं
अशा पद्धतीने आयपीएलमध्ये दिग्गज कर्णधारांच्या एका युगाचा शेवट झालाय. गेल्या काही काळात टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये अनेक युवा खेळाडूंची एन्ट्री झालीय. भारतीय क्रिकेटचं भविष्य आता युवा खेळाडूंच्या हाती आलंय हे याचं द्योतक म्हणावं लागेल.