IPL 2024 Hardik Pandya Video: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) चर्चेचा विषय ठरलाय. सलग दोन पराभव पत्करावे लागल्याने हार्दिकवर मुंबईकर प्रचंड संतापले आहेत. त्यातच आता हार्दिकचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल झाला आहे. यानंतर हार्दिक पुन्हा एकदा वादात अडकला आहे. हार्दिक पांड्याच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडालीय. या व्हिडिओत मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांज्या बॉलिंग कोच लसिथ मलिंगाला भर मैदानात धक्का मारताना दिसत आहे. या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर हार्दिक पांड्याला ट्रोल केलंय जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिकचा मलिंगाला धक्का
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाददरम्यानच्या सामन्यातील आहे. बुधवारी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडिअमवर हा सामना खेळवण्यात आला. सनराजर्स हैदाराबादने 277 धावांचा डोंगर रचला. याला उत्तर देताना मुंबई इंडियन्सने 246 धावा केल्या. पण 31 धावांनी मुंबईचा पराभव झाला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना हात मिळवत असताना मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच लसिथ मलिंगा मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याजवळ गेला. लसिथ मलिंगा (Lasith Malinga) हार्दिक पांड्याची गळाभेट घेण्यासाठी पुढे सरसावला. पण हार्दिक पांड्याने मलिंगाला धक्का देत बाजूला केलं. इतकंच काय तर हार्दिकने मलिगांशी हातही मिळवला नाही. त्याच्याकडे बघितलं न बघितल्यासारखं केलं. हार्दिकच्या या अनपेक्षित वागण्याने मलिंगाचा चेहरा पडला होता. 


सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
हार्दिक पांड्या लसिथ मलिंगाकडे न पाहाताच पुढे निघून जाताना या व्हिडिओ दिसतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगावने व्हायरल होत आहे. त्याआधी आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. डग एरियात लसिथ मलिंगा आणि कायरन पोलार्ड खूर्चीवर बसलेलेल दिसतायत. त्याठिकाणी हार्दिक पांड्या पोहोचला. हार्दिकला पाहाताच पोलार्ड खूर्चीवरुन उठला. पण लसिथ मलिगांनी पोलार्डला थांबवत स्वत:ची खूर्ची हार्दिक पांड्याला बसायला दिली. हार्दिकने मलिंगा थांबवण्याचाही प्रयत्न केला नाही.


मुंबई इंडियन्समधले अनेक सीनिअर खेळाडू हार्दिक पांड्याच्या अशा वागण्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याने मुंबई इंडियन्स दोन गटात विभागली गेल्याची जोरदार चर्चा आहे. 



मुंबई पॉईंटटेबलमध्ये तळाला
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग दोन पराभव पत्करावे लागले आहेत. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबईवर मात केली. तर दुसऱ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने मुंबईला धूळ चारली. सलग दोन पराभवांमुळे मुंबई इंडियन्स पॉईंट टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. 


चाहत्यांचा निशाण्यावर हार्दिक
सलग दोन पराभवामुळे हार्दिक पांड्या मुंबईकरांच्या निशाण्यावर आलाय. अहमदाबाद आणि हैदारबाद स्टेडिअमवर चाहत्यांना हार्दिकविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.