IPL 2024, PBKS vs SRH: पंजाब की हैदराबाद? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
PBKS vs SRH head to head : आज पंजाब आणि हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना मुल्लानपूरमधील महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
IPL 2024 PBKS vs SRH in Marathi : आयपीएलच्या 17 व्या हंगामात आजचा (9 एप्रिल) सामना सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. पॅट कमिन्स आणि शिखर धवन यांच्यातील सामना कोण जिंकणार? हा सामना मुल्लानपूरमधील महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. दोन्ही संघासाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे.
सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघाला आपल्या तिसऱ्या विजयाची प्रतिक्षा असणार आहे. या दोन्ही संघाला प्रत्येकी चार सामन्यात दोन दोन विजय मिळाले आहेत. पण सरस नेटरनरेटच्या जोरावर हैदराबाद गुणतालिकेत पंजाबपेक्षा वरच्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात खेळपट्टी कशी असले, हवामानाचा अंदाज काय असेल. तसेच हेड टू हेड , पाहा दोन्ही संघाचे संभाव्य प्लेईंग 11...
हेड टू हेड
सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांचा पाचवा सामना असणार आहे. आयपीएलमध्ये पीबीकेएस आणि एसआरएच यांच्यात आतापर्यंत 21 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये पंजाबने 7 सामने जिंकले आणि हैदराबादने 14 सामने जिंकले. तर आतापर्यंत पंजाबने हैदराबादविरुद्ध सर्वाधिक 211 धावांची मजल मारली आहे. तर त्याचवेळी पंजाबने हैदराबादविरुद्ध सर्वाधिक 212 धावांची खेळी केली होती.
अशी असेल खेळपट्टी
मुल्लानपूरची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी योग्य असणार आहे. फक्त, फलंदाजांना थोडी अधिक मदत मिळू शकली. या पिचवार चेंडु बॅटवर चांगला येतो. त्यामुळे सामन्यात मोठी धावसंख्या गाठता येईल. तसेच वेगवान गोलंदाजांना पिचिंग बॉलर्सपेक्षा जास्त मदत मिळते.
हवामानाचा अंदाज
मुल्लानपूरमध्ये पावसाची शक्यता नाही. तसेच, सामना सुरू होण्याच्या वेळी तापमान 24 अंशांपर्यंत असेल. तसेच मुल्लानपूरमध्ये आर्द्रता 21 टक्के इतकी आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11
सनरायझर्स हैदराबाद- अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन.
पंजाब किंग्ज- शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), प्रभसिमरन सिंग, सॅम कुरान, शशांक सिंग, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.