IPL trade window Closed : आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मिनी लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच हा लिलाव (IPL 2024 Auction) परदेशात होणार आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने लिलावासाठी आता फायनल यादी (IPL 2024 Auction Player list) जाहीर केली आहे. त्यानुसार आता 333 खेळाडूंना लिलावासाठी निवडण्यात आलंय. हा मिनी लिलाव कोका-कोला एरिना येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिलावासाठी निवडलेल्या 333 खेळाडूंपैकी 214 भारतीय आहेत, तर 119 परदेशी खेळाडू आहेत. तसेच, या यादीत 111 कॅप्ड आणि 215 अनकॅप्ड खेळाडू आहेत. आयपीएलने जाहीर केलेल्या खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर 1 कोटी, 50 लाख, 75 लाख, 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या खेळाडूंचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.



इंडियन प्रीमियर लीग 2024 सीझनसाठी खेळाडू रिटेन्शन विंडो आज बंद होत असताना, 10 फ्रँचायझींनी एकत्रितपणे 173 खेळाडूंना कायम ठेवलं आहे. परदेशातील खेळाडूंसाठी जास्तीत जास्त 77 स्लॉट्स उपलब्ध आहेत. त्यातील फक्त परदेशी 30 खेळाडूंना संधी मिळू शकते.


कोणाकडे किती रक्कम बाकी?


चेन्नई सुपर किंग्ज :  31.40 कोटी
दिल्ली कॅपिटल्स :  28.95 कोटी
गुजरात टायटन्स :  २३.१५ कोटी
कोलकाता नाइट रायडर्स : 32.70 कोटी
लखनऊ सुपर जायंट्स :  13.15 कोटी
मुंबई इंडियन्स : 15.25 कोटी
पंजाब किंग्ज :  २९.१० कोटी
राजस्थान रॉयल्स :  14.50 कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : 23.25 कोटी
सनरायझर्स हैदराबाद :  34.00 कोटी.