IPL 2024 Points Table After RR Beat MI: इंडियन प्रिमिअर लीग 2024 च्या 14 व्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने 27 बॉल आणि 6 विकेट्स राखून मुंबई इंडियन्सच्या संघाला घरच्या मैदानावर धूळ चारली. हा राजस्थानने जिंकलेला सलग तिसरा सामना ठरला. तर मुंबईने पराभवाची लाजीरवाणी हॅटट्रीक केली आहे. या पराभावामुळे आपल्या 14 सामन्यांपैकी मुंबईने 3 सामने गमावले असून पॉइण्ट्स टेबलमध्ये मुंबई तळाशी आहे. दुसरीकडे तिसऱ्या विजयासहीत संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानच्या संघाने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.


राजस्थान नंबर वन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानच्या संघाने मुंबईला पराभूत करुन कोलकात्याची पहिलं स्थान खेचून घेतलं आहे. मुंबई आणि राजस्थानविरुद्धच्या सामान्यानंतर पॉइण्ट्स टेबलमधील अव्वल 3 संघांमध्येच फेरफार झाला आहे. राजस्थान सध्या 3 पैकी 3 विजय मिळवून 6 पॉइण्ट्ससहीत पहिल्या स्थानी आहे. दुसऱ्या स्थानावर कोलकात्याचा संघ आहे. कोलकात्याचा संघ 2 सामने जिंकला आहे. पण नेट रन रेटच्या जोरावर ते चेन्नई आणि गुजरात इतके 4 पॉइण्ट्स असूनही दुसऱ्या स्थानी आहेत. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला दिल्ली डेअरडेव्हल्सच्या संघाने 20 धावांनी पराभूत केल्याने चेन्नईच्या संघाने पॉइण्ट्स टेबलमधील आपलं पहिलं स्थान गमावल्यानंतर दुसऱ्या दिवशी धोनीचा संघ दुसऱ्यावरुन तिसऱ्या स्थानी सरकला आहे. तिसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्जचा संघ असून त्यांच्या नावावर एक पराभव आणि 2 विजयांची नोंद आहे. चौथ्या स्थानी असलेल्या गुजरातने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने आपल्या 3 पैकी 1 सामन्यात मोठा विजय मिळवल्याने ते एक सामना जिंकूनही पाचव्या स्थानी आहे. सहाव्या स्थानी 2 पैकी एक विजय एका पराभवासहीत लखनऊ सुपर जायंट्सचा संघ आहे.


मुंबई तळाला


सातव्या स्थानी स्पर्धेत रविवारी पहिला विजय मिळवणारा ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. आठव्या स्थानी पंजाब किंग्स इलेव्हनचा संघ असून नवव्या स्थानी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आहे. दोन्ही संघांनी आपआपल्या 3 पैकी 2 सामने गमावेल असून प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. पॉइण्ट्स टेबलमध्ये विजयाच्या कॉलममध्ये आणि पॉइण्ट्सच्या कॉलममधील भोपळा न फोडता आलेला मुंबईचा संघ 3 सामन्यानंतरही तळाशी आहे. हा सामना दुपारी साडेचारला सुरु होईल. उणे 0.925 वरुन मुंबईचं नेट रन रेट अधिक पडलं असून तिसऱ्या पराभवानंतर ते उणे -1.423 पर्यंत पडलं आहे. मुंबईला नेट रन रेटमध्ये मोठा फटका बसणं स्पर्धेच्या दृष्टीने घातक ठरु शकतं. ग्रुप स्टेज संपताना समान पॉइण्ट्स असलेल्या संघांना नेट रन रेटच्या जोरावर टॉप 4 मध्ये जागा मिळते.



मुंबईचा पुढील सामना कधी?


मुंबईचा पुढचा सामना वानखेडेवरच होणार आहे. 7 एप्रिल रोजी होणाऱ्या या सामन्यात मुंबईचा संघ दिल्लीच्या संघाविरुद्ध मैदानात उतरणार असून चौथ्या सामन्यात तरी मुंबईला विजय मिळतो का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.