गुजरातच्या विजयानंतर पॉईंटटेबलमध्ये उलटफेर, चेन्नई नाही तर `हा` संघ अव्वल
IPL Points Table : आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात झाली. तीन दिवसात सर्व दहा संघांचा प्रत्येकी एक सामना खेळवण्यात आला असून पॉईंटटेबलही अपडेट झालं आहे. पाच सामन्यांनंतर पॉईंटटेबलमध्ये कोणता संघ अव्वल आणि कोणता संघ तळाला यावर एक नजर टाकूया.
IPL 2024 Points Table : आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 5 सामने खेळवण्यात आले आहेत. म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व दहा संघांचा प्रत्येकी एक सामना खेळवण्यआत आला आहे. पाचवा सामना रविवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सदरम्यान (GT vs MI IPL 2024) खेळवण्यात आला. या सामन्या गुजरात टायटन्सने चुरशीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सहा धावांनी पराभव केला आणि विजयाचं खातं उघडलं. तर मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये आपल्या पहिल्या पराभवाची परंपरा कायम ठेवली आहे. या सामन्यानंतर पॉईंटटेबलमध्ये (IPL 2024 Points updates) मोठा उलटफेर झाला आहे.
पॉईंटटेबलमध्ये उलटफेर
पॉईंटटेबलमध्ये सध्या संजू सॅमसनची राजस्थान रॉयल अव्वल क्रमांकावर (Rajasthan Royals IPL 2024 Points) आहे. राजस्थान रॉयल्सने केएल राहुलच्या लखनऊ सुपर जायंट्सचा मोठ्या फरकाने पराभव केला. राजस्थानने 193 धावा केल्या होत्या. तर लखनऊच्या संघाला 173 धावा करता आल्या. दुसऱ्या क्रमंकावर गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा नंबर (CSK IPL 2024 Points) लागतो. राजस्थानचा नेट रन रेट चेन्नईपेक्षा चांगला असल्या कारणाने राजस्थान सध्या टॉपवर आहे.
आयपीएल पॉईंटटेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्स आहे. पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत विजयाचं खातं उघडलं. मुंबईवर मात करणारी गुजरात टायटन्स चौथ्या क्रमांकावर आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स एका विजयासह पॉईंटटेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. पाचही संघाने प्रत्येकी एक विजय मिळवालय.
या संघांची पराभवाने सुरुवात
आयपीएल 2024 ची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी निराशाजनक ठरली. चेन्नईविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात आरसीबीला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पॉईंटटेबलमध्ये आरसीबी थेट नवव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव स्विकारलेला हैदराबादचा संघ पॉईंट टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्स सातव्या क्रमांकावर असून आठव्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. पॉईंटटेबलमध्ये सर्वात तळाला म्हणजे दहाव्या क्रमांकावर लखनऊ सुपर जायंटसचा संघ आहे.
पण ही केवळ सुरुवात आहे. प्रत्येक संघ जवळपास 14 सामने खेळणार आहे. त्यामुळे पॉईंटटेबलचं चित्र आणखी बदलू शकतं.
ऑरेंज कॅप
पहिल्या पाच सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक धावा केल्या आहेत. संजूने लखनऊविरोधातल्या सामन्यात 82 धावांची खेळी केली. त्यामुळे सध्या तो ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर निकोलस पूरन, तर तिसऱ्या क्रमांकावर आंद्रे रसेल आहे. सॅम करन चौथ्या आणि हेनरिक क्लासेन पाचव्या क्रमांकावर आहे.
पर्पल कॅप
सर्वाधिक जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चेन्नईच मुस्तफिजूर रहमान पहिल्या क्रमांकावर आहे. मुस्तफिजूर रहमानने पहिल्याच सामन्यात चार विकेट घेतल्या होत्या. तर तीन विकेट घेणारा जसप्रीत बुमराह दुसऱ्या आणि टी नटराजन तिसऱ्या क्रमांकावर आहे.