IPL 2024 : स्टब्सची झुंज अपयशी, राजस्थानचा `रॉयल` विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
IPL 2024 : आयपीएलच्या नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सवर दमदार विजय मिळवलाय. राजस्थानचा हा सलग दुसरा विजय ठरला. तर दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग दुसरा पराभव ठरलाय.
IPL 2024 : आयपीएलच्या नवव्या सामन्यात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानने रॉयल विजय मिळलाय. राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सवर 12 धावांनी मात केली. राजस्थान रॉयल्सने पहिली फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्ससमोर 186 धावांच आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना दिल्ली कॅपिटल्सने 5 विकेट गमावत 175 धावा केल्या. राजस्थानच्या ट्रिस्टन स्टब्जने विजयासाठी जोरदार झुंज दिली. त्याने नाबाद 44 धावा केल्या. पण संघाला तो विजय मिळवून देऊ शकला नाही. दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग दुसरा पराभव ठरलाय. तर राजस्थान रॉयल्सचा हा सलग दुसरा विजय ठरलाय.
दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी
विजयासाठी 186 धावांचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) दमदार सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या जोडीने पहिल्या विकेटसाठी 30 धावांची पार्टनरशिप केली. पण फटकेबाजीच्या नादात मार्श 23 धावा करुन बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला रिकी भूई भोपळा न फोडताच पॅव्हेलिअनमध्ये परतला. कर्णधार ऋषभ पंतने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला पण 28 धावा करुन तोही बाद झाला. दुसऱ्या बाजूला वॉर्नरने फटेबाजी सुरु ठेवली होती. पण अर्धशतकाला एक धाव कमी असताना आवेश खानच्या गोलंदाजीवर संदीप शर्माकडे झेल देऊन तोही बाद झाला.
राजस्थान रॉयलची फलंदाजी
पहिली फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची (Rajasthan Royals) सुरुवात खराब झाली. 36 धावांवर तीन फलंदाज बाद झाले. यात यशस्वी जायसवाल (5), कर्णधार संजू सॅमसन (15) आणि जोस बटलर (11) यांचा समावेश होता. राजस्थान 150 धावांचा टप्पाही गाठणार नाही असं वाटत होतं. पण त्यानंतर आलेल्या रियान पराग आणि आर अश्विनने सर्व सूत्र आपल्या हाती घेतली. रियान-अश्विनने 37 चेंडूत 54 धावांची पार्टनरशिप केली. अश्विन 29 धावांवर बाद झाला. आपल्या खेळीत त्याने 3 षटकार ठोकले.
रियान परागची फटकेबाजी
रियान परागने (Riyan Parag) एका बाजूला फटकेबाजी सुरुच ठेवली. 34 चेंडूत त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. ध्रुव जुरेलबरोबर त्याने 23 चेंडूत 52 धावांची पार्टनरशिप केली. तर शिमरॉन हेटमायरबरोबर त्याने 43 धावांची पार्टनरशिप केली. रियान पराने शेवटपर्यंत फलंदाजी राजस्थान रॉयलला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. परागने अवघ्या 45 चेंडूत 84 धावांची तुफान खेळी केली. यात त्याने 6 षटकार आणि 7 चौकार लगावले. दिल्लीच्या नॉर्कियाच्या शेवटच्या षटकात रियानने तबब्ल तीन चौकार आणि दोन खणखणीत षटकार लगावले.
दिल्लीतर्फ खलील अहमद, कुलदीप यादव, अक्षर पटेल, एनरिक नॉर्किया आणि मुकेश कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दिल्लीच्या संघात दोन बदल
या सामन्यासाठी दिल्लीने आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले होते वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने त्याला विश्रांती देण्यात आली. तर शाय होपला पाठदुखीचा त्रास झाल्याने त्यालाही बाहेर बसवण्यात आलं. त्यांच्या जागी एनरिक नॉर्किया आणि मुकेश कुमार यांना संधी देण्यात आली.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ
डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, सुमित कुमार, खलील अहमद, मुकेश कुमार आणि एनरिक नॉर्किया
राजस्थान रॉयल्सचा संघ
जोस बटलर, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, आर अश्विन, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट आणि आवेश खान