IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी (Royal Challengers Bengaluru) काहीच चांगलं होत नाहीए. संघात एकाहून एक दिग्गज खेळाडू असतानाही आरसीबीला (RCB) विजय मिळवता येत नाहीए. सात सामन्यांपैकी बंगळुरुला तब्बल सहा सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. या खराब कामगिरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आयपीएल पॉईंटटेबलमध्ये (IPL Point Table) सर्वात शेवटच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये अद्याप एकही जेतेपद मिळवू न शकलेल्या आरसीबीसाठी यंदाच्या हंगामात प्ले ऑफ गाठणंही अवघड होऊन बसलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरुला आणखी एक धक्का
आरसीबीसमोर समस्यांचा डोंगर असतानाच आता आणखी एक धक्का बसला आहे. आरसीबीचा स्टार ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. यासाठी मॅक्सवेलने मानसिक थकव्याचं कारण दिलं आहे. मॅक्सवेलने 'मेंटर आणि फिजिकल ब्रेक' घेत असल्याची विनंती आरसीबी मॅनेजमेंटकडे केली. त्याची विनंती मान्य करण्यात आली आहे. मॅक्सवेलच्या गैरहजेरीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मोठा फटका बसणार आहे. 


बंगळुरुच्या सहाव्या सामन्यात मॅक्सवेलला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नव्हती. या सामन्यानंतर बोलताना मॅक्सवेलने आपण ब्रेक घेत असल्याचं सांगितलं. वैयक्तिक दृष्ट्या हा निर्णय घेणं सोप नाही, शेवटच्या सामन्यानंतर मी कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि प्रशिक्षकांकडे गेलो. संघात आपल्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी देण्याची वेळ आली असल्याचं त्यांना सांगितलं. मला काही काळ मानसिक आणि शारिरीक आरामाची गरज असल्याचंही त्याने संघाला सांगतिलं.


यंदाच्या हंगामात मला संघाला गरज असताना लौकीकीला साजेशी कामगिरी करता आली नाही. यामुळे आयपीएल पॉईंट टेबलमध्येही याचे परिणाम जाणवत आहेत. त्यामुळे दुसऱ्या खेळाडूला संधी मिळण्याची गरज होती, असंही मॅक्सवेलने संघ व्यवस्थापनाला सांगितलं.


मॅक्सवेलची आयपीएल 2024 मधली कामगिरी
आयपीएल 2024 मध्ये मॅक्सेवलच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला आहे. मॅक्सवेलने सहा सामन्या केवळ 32 धावा केल्या आहेत. दोन सामन्यात तो शु्न्यावर बाद झाला. आयपीएल 2024 च्या आधी मॅक्सवेल जबरदस्त फॉर्मात होता. त्याने 17 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात तब्बल 552 धावा ठोकल्या. या दरम्यान दोन शतकंही त्याच्या नावावर आहेत. 


मॅक्सेवलला केलं होतं रिटेन
ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलला आरसीबीने रिटेन केलं होतं. त्याच्या 11 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. आयपीएलच्या 2021 च्या हंगामात मॅक्सवेलने 15 सामन्यात 513 धावा केल्या होत्या. 


मॅक्सवेलची आयपीएलमधली कामगिरी
ग्लेन मॅक्सवेल आयपीएलमध्ये आतापर्यंत 130 सामने खेळला आहे. यात त्याने 156.40 च्या स्ट्राईक रेटने 2751 धावा केल्या आहेत. तर 46 झेल टिपले आहेत. आशिवाय 130 सामन्यात मॅक्सवेलने 35 विकेट घेतल्यात. 15 धावात 2 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.