Virat Kohli bags big T20 Record : तब्बल दोन महिन्यांनी क्रिकेटच्या मैदानात उतरणाऱ्या विराट कोहलीने (Virat Kohli) दमदार कमबॅक केलाय. आयपीएलच्या सतराव्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात कोहलीच्या नावावर विराट विक्रम जमा झाला आहे. आयपीएलचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान (CSK) रंगला. या सामन्यात 6 धावा करताच विराट कोहलीने टी20 क्रिकेटमध्ये विक्रम रचला आहे. आजपर्यंत एकाही भारतीय फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा
विराट कोहलीने 6 धावा करताच टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या. असा विक्रम करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. हा टप्पा गाठण्यासाठी विराट कोहलीला 360 इनिंग खेळाव्या लागल्या. सर्वात वेगवान 12 हजार धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर जमा झाला आहे. विराट कोहली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर वेस्टइंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेल आहे. ख्रिस गेलने 345 इनिंगमध्ये 12 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. 


टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
विराट कोहली- 12000 धावा*त
रोहित शर्मा - 11156 धावा
शिखर धवन- 9465 धावा
सुरेश रैना - 8654 धावा
केएल राहुल- 7066 धावा


दिग्गजांच्या क्लबमध्ये सामील
विराट कोहलीच्या या कामगिरीने तो ख्रिस गेल, कायरन पोलार्ड आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या फलंदाजांनी टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा टप्पा पूर्ण केलाय. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलने टी20 क्रिकेटमध्ये तब्बल 14562 धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा शोएब मलिक या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मलिकने टी20 क्रिकेटमध्ये 13360 धावा केल्यात.


टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
ख्रिस गेल - 14562 धावा
शोएब मलिक - 13360 धावा
कायरन पोलार्ड- 12900 धावा
एलेक्स हेल्स - 12225 धावा
डेविड वार्नर - 12065 धावा
विराट कोहली- 12000 धावा


विराटची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द


विराट कोहलीने आंतराष्ट्रीय टी20 कारकिर्दीत 117 सामन्यात 4037 धावा केल्या आहेत. तर 238 आयीएल सामन्यात 7284 धावा केल्यात.