Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL 2024) 15 व्या सामना आज (2 एप्रिल ) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सशी यांच्यात होणार आहे. हे दोन्ही संघ या सामन्यात दुसरा विजय मिळवण्याचा प्रयत्नात असतील. लखनऊने आतापर्यंत दोन सामने खेळले असून एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे, तर बेंगळुरू संघाने तीन सामने खेळले असून 2 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. परिणाणी आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरसीबी विरुद्ध एलएसजीचा सामना आज, 2 एप्रिलला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु येथे होणार आहे. तसेच लखनऊ हा या हंगामात तिसरा सामना तर आरसीबीचा चौथा सामना खेळणार आहे. लखनऊ आणि बंगळुरू या दोन्ही संघांना आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकण्यात यश आलं आहे. लखनऊ आणि आरसीबी हे दोन्ही संघ अनुक्रमे सहाव्या आणि नवव्यासह लीग पॉइंट टेबलमध्ये आहेत. त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यात विजयी मार्ग साधण्याचा प्रयत्नात असतील. 


दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड


आरसीबी आणि एलएसजी या दोन्ही संघांने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. आरसीबीने 3 आणि एलएसजीने 1 सामना जिंकला आहे. हा रेकॉर्ड सुधारण्याचा एलएसजीचा प्रयत्न असणार आहे. 


असा असेल पिच रिपोर्ट


बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे मैदानावर मोठ्या प्रमाणात धावा होण्याची शक्यता आहे. तसेच वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत मिळू शकते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.


हवामानाचा अंदाज


हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सामान्य कालावधीत तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तसेच पावसाची शक्यता केवळ एक टक्का आहे.   


दोन्ही संघांची संभाव्या प्लेईंग 11 


रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल, विजयकुमार वैशाख


लखनऊ सुपर जायंट्स : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, केएल राहुल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (कर्णधार), आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, एम. सिद्धार्थ, नवीन-उल-हक