IPL Retention: पाच वेळा ट्रॉफी जिंकून देणाऱ्या MI संघाने टॉप 3 मध्येही घेतलं नाही; रोहितने सोडलं मौन, `जे खेळाडू...`
Rohit Sharma on MI Retention List: आगामी आयपीएलसाठी (IPL) संघांनी आपली रिटेंशन यादी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पाच खेळाडूंना रिटेन केलं असून यादीत रोहित शर्मा (Rohit Sharma) चौथ्या स्थानावर आहे.
Rohit Sharma on MI Retention List: आगामी आयपीएलसाठी (IPL) संघांनी आपली रिटेंशन यादी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पाच खेळाडूंना रिटेन केलं आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) राष्ट्रीय संघातील खेळाडूंना रिटेन करण्याच्या निर्णयाच स्वागत केलं आहे, तर दुसरीकडे हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) पाच बोटं, पण एक मूठ असं विश्लेषण केलं आहे.
"मी आता या फॉरमॅटमधून निवृत्त झालो असल्याने हा माझ्यासाठी (रिटेंशन) योग्य क्रमांक आहे. जे खेळाडू राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांना प्राथमिकता दिली जावी यावर माझा विश्वास आहे. जेव्हा तुम्ही नव्या लिलावात सहभागी होता तेव्हा ते फार आव्हानात्मक असतं आणि तुम्ही खेळाडूंना रिटेन करणं सुरु करता," असं रोहित शर्माने म्हटलं. रोहित शर्माला संघाने मुंबईला आतापर्यंत पाच वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे.
'तुम्ही तो विराट कोहली आहे हे विसरुन जा,' संजय मांजरेकरने RCB चाहत्यांना सुनावलं, म्हणाला 'तो आता दिग्गज वैगेरे...'
मागील हंगामात खालच्या क्रमांकावर राहण्याची दयनीय अवस्था झाल्यानंतर आता रोहित शर्माने पुढील हंगामात आपण सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न करु असं सांगितलं आहे. "मुंबई संघात आम्ही नेहमीच खेळाडूंचा कोअर ग्रुप कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आता पुढील वाटचाल करताना मला वाटतं आम्ही एक चांगला लिलाव करत सामना जिंकू शकतील अशा खेळाडूंचा एक गट तायर करण्याचा प्रयत्न असेल," असं रोहित म्हणाला आहे.
"आम्ही योग्य पाऊल उचलू आणि ती परंपरा पुन्हा एकदा परत आणू," असा विश्वास रोहित शर्माने व्यक्त केला आहे. हार्दिक पांड्याला संघात घेत नेतृत्व सोपवल्यानंतर अनेकांना आता रोहितचं भवितव्य काय असेल याची चिंता लागली होती.
India vs New Zealand: फलंदाजी करताना मिशेल सरफराजवर संतापला, अम्पायरला म्हणाला 'याला समजवा...'; रोहितही अडून राहिला
"मी मुंबई इंडियन्ससाठी खूप क्रिकेट खेळलो आहे. इथे आल्याचा मला आनंद आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत आमच्याकडे हंगामातील सर्वोत्तम खेळ झाला नाही. पण ते बदलण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्ही एकमेकांच्या मदतीसाठी प्रयत्न करु आणि आशा आहे की, आम्ही गोष्टी बदलू शकू," असं रोहित म्हणाला.
"मुंबई इंडियन्सचा ट्रॉफी जिंकण्याचा, अविश्वसनीय परिस्थितीतून खेळ जिंकण्याचा समृद्ध इतिहास आहे. मी (आंतरराष्ट्रीय) फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे, मला वाटतं की हे माझ्यासाठी योग्य ठिकाण आहे," असं त्याने सांगितलं.
"माझ्या आयुष्यात मी जे काही मिळवले ते सर्व मुंबई इंडियन्सचा भाग आहे. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मधील ग्रुप म्हणून आम्हाला ओळखलं जातं. आमच्या सर्व चाहत्यांना माहिती आहे क, त्या वर्षांत काय झाले. आम्ही 2025 मध्ये त्यापेक्षाही मजबूत स्थितीने पुनरागन करणार आहोत,” असं तो म्हणाला.
जसप्रीत बुमराह (18 कोटी), सूर्यकुमार यादव (16.35 कोटी), हार्दिक (16.35 कोटी), रोहित (16.30 कोटी) आणि तिलक वर्मा (8 कोटी) यांना रिटेन केल्यानंतर मुंबई इंडियन्सकडे 45 कोटी रुपये शिल्लक आहेत.