IPL 2024 चं वेळापत्रक जाहीर, `या` तारखेला पहिला सामना... पाहा एका क्लिकवर संपूर्ण वेळापत्रक
IPL 2024 Full Schedule in Marathi: इंडियन प्रीमिअर लीग 2024 चं वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणूकची तारीख लक्षात घेऊन आयपीएलच्या सतराव्या हंगामाचं (IPL 2024 Time Table) वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
IPL 2024 Schedule in Marathi: इंडियन प्रीमिअर लीग 2024 चं वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणूकची तारीख लक्षात घेऊन आयपीएलच्या सतराव्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आयपीएलमध्ये पहिला सामना महेंद्र सिंग धोणीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान होणार आहे. हा सामना चेन्नईत खेळवला जाणार असून 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पहिला सामना 22 मार्चला खेळवला जाणार आहे.
लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यानचा पहिला टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान 22 मार्चला खेळवला जाणार आहे. तर आयपीएलचा अंतिम सामना 26 तारखेला होण्याची शक्यता आहे. आयीएल 2024 चा हंगाम आयपीएल 2023 प्रमाणेच होणार आहे.
आयपीएल 2024 मध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. पण गेल्या वर्षी 60 दिवस स्पर्धा खेळवण्यात आली होती. यावेळी 67 दिवस स्पर्धा चालणार आहे. निवडणुकांमुळे आयपीएलच्या वेळापत्रकात एक आठवडा वाढवण्यात आला आहे.
2019 मध्ये देशात लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळीही आयपीएल स्पर्धा भारतातच खेळवण्यात आली होती. दोन भागात ही स्पर्धा पार पडली होती. यावेळीही तशाच प्रकारे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
आयपीएलचे उर्वरीत वेळापत्रक कधी
आयपीएल अध्यक्ष अरुण धूमल यांनी 22 मार्चला आयपीएलचा पहिला सामना होणार असल्याचे संकेत आधीच दिले होते. आयपीएलचं वेळापत्रक दोन भागात असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. त्यानुसार 22 फेब्रुवारीला पहिला टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरा टप्पा लोकसभा निवडणूकांच्या घोषणेनंतर होण्याची शक्यता आहे.
आयपीएल 2024 वेळापत्रक शनिवार-रविवारी डबल हेडर
आयपीएलचा पहिला सामना शुक्रवारी होणार आहे, शनिवार आणि रविवारी डबल हेडर सामने खेळवले जाणार आहे. 21 सामन्यात चार वेळा डबल हेडरचे सामने होणार आहेत. यानुसार पहिला सामना दुपारी 3.30 तर दुसरा सामना संध्याकाळी 7.30 खेळवला जाईल.
आयपीएल 2024 वेळापत्रक - या चार दिवस डबल हेडर
23 मार्च- पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
23 मार्च- कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद
24 मार्च- राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
24 मार्च- गुजरात टाइटन्स विरुद्ध मुंबई इंडियंस
31 मार्च- गुजरात टाइटन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद
31 मार्च- दिल्ली कैपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
7 अप्रैल- मुंबई इंडियंस विरुद्ध दिल्ली कैपिटल्स
7 अप्रैल- लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स