IPL 2024 : आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्समध्ये (MI) खरेदी केल्यानंतर शुभमन गिलची (shubman gill) गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईने हार्दिकला 17.50 कोटी रुपयांचा खेळाडू देऊन ट्रेड केल्यानंतर गुजरातने आता याची घोषणा केली आहे. रिटेन्शन लिस्ट जाहीर झाली तेव्हा गुजरात टायटन्सने त्यांचा मुख्य अष्टपैलू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार म्हणून कायम ठेवलं होतं. मात्र त्यानंतर काही वेळातच हार्दिक मुंबईकडून ट्रेड झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर आता शुभमन गिल आयपीएलमध्ये गुजरातचे नेतृत्व करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्याच्या जाण्याच्या घोषणेसोबतच गुजरात टायटन्सनेही शुभमन गिलच्या नावाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल गुजरातचा नवा कर्णधार असणार आहे. गेल्या मोसमात रशीद खानकडे उपकर्णधारपद होते. हार्दिकच्या जागी तो काही सामन्यांमध्ये कर्णधार पदाची धुरा सांभाळताना दिसला होता. मात्र त्याऐवजी शुभमन गिलला कर्णधार करण्यात आलं आहे. शुभमन गिलसाठी हे वर्ष चांगलं ठरलं आहे. त्याने आतापर्यंत 45 सामन्यांमध्ये 2118 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 7 शतके आणि 10 अर्धशतके ठोकली आहेत. वर्षभरात त्याची सरासरी 50.42 इतकी आहे.



आयपीएल 2023 मध्ये मिळाली होती ऑरेंज कॅप


युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने गेल्या हंगामात आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. गिलने 17 सामन्यात 890 धावा केल्या. त्याने 3 शतकेही झळकावली. 2022 च्या मोसमातही गिलने 483 धावा केल्या होत्या. यंदाच्या मोसमात त्याच्याकडे फलंदाजीसोबतच कर्णधारपदाची जबाबदारी असेल.


गुजरात टायटन्सचा संघ


कायम ठेवलेले खेळाडू : डेव्हिड मिलर, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जोशुआ ली. , मोहित शर्मा.


करारमुक्त केलेल खेळाडू: यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडेन स्मिथ, अल्झारी जोसेफ, दासुन शनाका.