IPL 2024: `अशा` ठिकाणी असतात कॅमेरे ज्यांचा तुम्ही विचारही नाही करणार, पाहा किंमत
IPL 2024: आयपीएल सामन्यांदरम्यान अनेक ठिकाणी कॅमेरे बसवले जातात. यावेळी स्टंप आणि कॅपसोबत इतर ठिकाणीही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यावेळी कॅमेऱ्यांमध्येही अनेक विविध प्रकार दिसून येतात.
IPL 2024: आजपासून आयपीएलला सुरुवात झाली आहे. यावेळी पहिला सामना रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आहे. आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये अनेक मोठे बदल पहायला मिळाले आहेत. देशातील तसंच जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये आयपीएलची क्रेझ दिसून येतेय. स्टेडियममध्ये सामना पाहण्यासोबतच टीव्ही आणि स्मार्टफोनवरही मॅचचा आनंद लुटला जातो. मात्र तुम्हाला कल्पना आहे का की, टीव्ही किंवा स्मार्टफोनवर मॅच दाखवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॅमेऱ्याची किंमत किती आहे?
आयपीएलमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॅमेरांची किंमत किती?
आयपीएल सामन्यांदरम्यान अनेक ठिकाणी कॅमेरे बसवले जातात. यावेळी स्टंप आणि कॅपसोबत इतर ठिकाणीही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यावेळी कॅमेऱ्यांमध्येही अनेक विविध प्रकार दिसून येतात. यामध्ये लाइव्ह मॅच कॅमेरा, स्पायडर कॅमेरा, रोबो कॅम आणि हॉक-आय कॅमेरा हे महत्त्वाचे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये 50 पेक्षा जास्त कॅमेरे बसवले जातात. यापैकी लाइव्ह मॅच कॅमेरा खूपच महाग आहे. त्याची किंमत 40 लाखांपेक्षा जास्त असण्याची शक्यता असते. याशिवाय कॅमेरांची किंमत त्यांच्या गुणवत्तेवर देखील अवलंबून असते.
कोण - कोणत्या ठिकाणी कॅमेरांचा वापर केला जातो?
आयपीएलमध्ये एलईडी स्टंप्सच्या मधल्या स्टंपवर एक छोटा कॅमेरा बसवला जातो. यामध्ये एक माईक देखील फीट करण्यात येतो. या माईकद्वारे खेळाडूंचा आवाज रेकॉर्ड करण्यात येतो. हा कॅमेरा रिप्ले दाखवण्यासाठी वापरला जातो. याशिवाय काही खेळाडूंच्या हेल्मेटमध्येही कॅमेरा लावण्यात येतोय. यामध्ये विकेटकीपर आणि अंपायरच्या हेल्मेटमध्ये कॅमेरा दिसून येतोय. मात्र सर्वच सामन्यांमध्ये ही पद्धत दिसून येत नाही.
IPL 2024 वेळापत्रक
२२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
२३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
२३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
२४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनऊ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
२४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
२५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
२६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
२७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
२८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
२९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
३० मार्च - लखनऊ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
१ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
२ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखनऊ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
७ एप्रिल - लखनऊ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनऊ