IPL 2024 Sunil Gavaskar On Major Weakness Of Mumbai Indians: इंडियन प्रिमिअर लीगच्या 2024 च्या पर्वामध्ये मुंबई इंडियन्ससंदर्भात सर्वात मोठी चर्चा ही संघाच्या कर्णधारपदाची आहे. संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा यंदा जवळपास एका दशकानंतर संघामध्ये अन्य खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. संघ व्यवस्थापनाने कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवल्याने मोठा वाद निर्णाम झाला. मुंबईच्या चाहत्यांनी या निर्णयाला विरोध केला असून आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. मात्र या वादाशिवाय 5 वेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईसमोर अजून एक मोठी समस्या आहे.


दोन गट पडल्याची चर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्याला मुकणार आहे. सूर्यकुमार जायबंदी असल्याने पहिल्या सामन्यात त्याला खेळता येणार नाही. मात्र या दुखापतीव्यतिरिक्त माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी मुंबईबद्दल आणखीन एक चिंता व्यक्त केली आहे. एकीकडे हार्दिक आणि रोहित असे दोन गट पडल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये दबक्या आवाजात सुरु असतानाच आता गावसकर यांनी संघासंदर्भातील दुबळ्या गोष्टीवर थेट बोट ठेवलं आहे.


मुंबईच्या संघातील कच्चा दुवा कोण?


गावसकर यांनी केलेल्या विश्लेषणानुसार, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सची शेवटच्या षटकांमधील गोलंदाजी ही दुबळी बाजू म्हणजेच विकनेस ठरु शकते. "शेवटच्या षटकांमधील गोलंदाजीचा विचार केल्यास त्याच्याकडे बुमराह आहे. मात्र दुसऱ्या बाजूने कादाचित अधिक धावा दिल्या जाऊ शकतात. त्यामुळेच मला हा मुंबईच्या संघाची कच्चा दुवा वाटत आहे," असं गावसकर यांनी म्हटलं आहे. 


मात्र ही दिलासादायक बाब


एकीकडे शेवटच्या षटकांमधील गोलंदाजीसंदर्भात चिंता व्यक्त करतानाच गावसकर यांनी मुंबईच्या संघाची फलंदाजी त्यांच्या गोलंदाजांना अधिक श्वास घेण्यास जागा मोकळीक देऊ शकतात, असं मतही गावसकर यांनी व्यक्त केलं. मुंबईची दमदार फलंदाजी ही संघासाठी दिलासादायक आणि जमेची बाजू असल्याचं गावसकर म्हणाले आहेत.


रोहित पुढेही मार्गदर्शन करत राहील


सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना हार्दिक पंड्याने रोहित शर्मा हा यापुढेही मला मार्गदर्शन करत राहील असा विश्वास व्यक्त केला आहे. संघ व्यवस्थापनाने अचानक नेतृत्वात बदल केला तरी त्याचा फारसा नकारात्मक परिणाम होणार नाही असंही पंड्या म्हणाला. हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्सच्या संघाला सलग 2 पर्वांमध्ये अंतिम सामन्यापर्यंत पोहचवलं. त्यापैकी एकदा जेतेपदावर नाव कोरलं तर 2023 मध्ये उपविजेता पदावर त्यांना समाधान मानावलं लागलं.


नक्की वाचा >> वरिष्ठ खेळाडूंना हार्दिकचं नेतृत्व अमान्य? रोहित, बुमराह नाराज? अलिबाग कनेक्शन चर्चेत


2023 च्या शेवटी प्लेअर्स ट्रेडदरम्यान मुंबईच्या संघाने हार्दिकला पुन्हा संघात स्थान दिलं. त्यानंतर अचानक एका दशकापासून नेतृत्व करणाऱ्या आणि 5 वेळा चषक जिंकून देणाऱ्या रोहितऐवजी पंड्याला कर्णधार करत असल्याची घोषणा मुंबई इंडियन्सने केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. "तसा काहीही फरक पडणार नाही. तो मला कायमच मदत करायला, मार्गदर्शन करायला उपलब्ध असेल. तो भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याचा मला फायदाच होईल. या संघाने जे काही मिळवलं आहे आणि त्यातही त्याच्या नेतृत्वाखाली जे यश मिळवलं आहे नक्कीच मला फायद्याचं ठरेल," असा विश्वास हार्दिकने व्यक्त केला. त्याने जे मिळवलं आहे तेच मला पुढेही चालू ठेवायचं आहे, असं हार्दिक म्हणाला.