दिल्लीत `तुफान आलंया`, सन`स्कोरर` हैदराबादचा रेकॉर्डब्रेक विजय, दिल्लीला धुळ चारली
IPL 2024 : ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला पराभवाची धुळ चारली. या विजयाबरोबरच सनरायजर्स हैदराबादने पॉईंटटेबलमध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
IPL 2024 DC vs SRH : आयपीएल 2024 च्या 35 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक विजय मिळवलाय. हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 67 धावांनी मात केली. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच दिल्लीचा संघ आपल्या होम ग्राऊंडवर खेळत होता. पण घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना दिल्लीच्या हाती निराशा आली. हैदराबादने पहिली फलंदाजी करताना 266 धावांचा डोंगर उभा केला. याला उत्तर देताना दिल्ली संघाला 199 धावा करता आल्या. या विजयासह हैदराबादचा संघ पॉईंटटेबलमध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. हैदराबादचा सात सामन्यातील हा पाचवा विजय ठरलाय. तर दिल्लीचा आठ सामन्यातील हा पाचवा पराभव ठरलाय.
दिल्लीचं चोख प्रत्युत्तर
विजयासाठी 267 धावांचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीला आलेला पृथ्वी शॉ अवघ्या 16 धावा करुन तर डेव्हिड वॉर्नर अवघी 1 धाव करुन बाद झाले. पण त्यानंतर जॅक फ्रेझर आणि अभिषेक पारोलने तुफान फटकेाबाजी करत हैदराबादला चोख प्रत्युत्तर दिलं. जॅक फ्रेझरने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळाकावलं. फ्रेझरने 18 चेंडूत 65 धावांची खेळी केली. यात त्याने 7 षटकार आणि 5 चौकारांची बरसात केली. फ्रेझर आणि पारोल बाद झाल्यानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने विजयासाठी जोरदार झुंज दिली. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. पंत 44 धावांवर बाद झाला.
दिल्लीत 'तुफान आलंया'
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या ट्रेव्हिस हेड (Travis Head) आणि अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) पहिल्या चेंडूपासून दिल्लीच्या गोलंदाजांच्या अक्षरश: चिंधड्या उडवल्या. हैदराबादने अवघ्या 5 षटकात स्कोअर बोर्डवर 100 धावा पूर्ण केल्या. हेडने 16 चेंडूत अर्धशतक ठोकलं.
पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड
ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या जोडीने पॉवर प्लेमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. अवघ्या 6 षटकात हैदराबादच्या नावावर होत्या 125धावा. आयपीएलमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावांचा हा रेकॉर्ड ठरला आहे. याआधी पॉवर प्लेमध्ये 105 धावांचा रेकॉर्ड होता. विशेष म्हणजे सनरायजर्स हैदराबादने यंदाच्या आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा अडीचशेहून अधिक धावांचा टप्पा गाठला आहे. दिल्लीच्या कुलदीप यादवने अभिषेक आणि हेडला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. पण त्याआधी या जोडीने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. हेड 32 चेंडूत 89 धावा करुन बाद झाला. यात त्याने 11 चौकार आणि 6 षटकरांची बरसात केली. तर अभिषेकने अवघ्या 12 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकार लगावत 46 धावा केल्या. यानंतर शाहबाज अहमदने 29 चेंडूत नाबाद 59 धावा करत सनरायजर्स हैदराबादला 266 धावांचा टप्पा गाठून दिला.
आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक
15 - जॅक फ्रेझर- vs सनरायजर्स हैदराबाद, हैदराबाद - आताच्या सामन्यात
16 - अभिषेक शर्मा vs मुंबई इंडियंस, हैदराबाद, 2024
16 - ट्रेविस हेड vs दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली, आताच्या सामन्यात
18 - ट्रेविस हेड vs मुंबई इंडिन्स, हैदराबाद, 2024
20 - डेविड वॉर्नर vs चेन्नई सुपर किंग्स, हैदराबाद, 2015
20 - डेविड वॉर्नर vs कोलकाता नाइट राइडर्स, हैदराबाद, 2017
आयपीएलमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक स्कोर
125/0 - सनराइजर्स हैदराबाद vs दिल्ली कैपिटल्स, 2024*
105/0 - कोलकाता नाइटराइडर्स vs आरसीबी, 2017
100/2 - चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स, 2014
90/0 - चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियंस, 2015
आयपीएलमध्ये पहिल्या 10 षटकात सर्वाधिक स्कोर
158/4 - सनराइजर्स हैदराबाद vs दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली, 2024*
148/2 - सनराइजर्स हैदराबाद vs मुंबई इंडियन्स, हैदराबाद, 2024
141/2 - मुंबई इंडियंस vs सनराइजर्स हैदराबाद, हैदराबाद, 2024
135/1 - कोलकाता नाइटराइडर्स vs दिल्ली कॅपिटल्स, विजाग, 2024
आपीएलमध्ये सर्वाधिक धावसंख्या
287/3 - सनराइजर्स हैदराबाद vs रॉयल चैलेंजर्स बंगळुरु, बंगळुरु 2024
277/3 - सनराइजर्स हैदराबाद vs मुंबई इंडियन्स, हैदराबाद 2024
272/7 - कोलकाता नाइटरायडर्स vs दिल्ली कॅपिटल्स, विजाग 2024
266/7 - सनराइजर्स हैदराबाद vs दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली, 2024
263/5 - रॉयल चैलेंजर्स बंगळुरु vs पुणे वॉरियर्स इंडिया, बंगळुरु 2013
आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार
22 - सनराइजर्स हैदराबाद vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, बंगळुरु, 2024
22 - सनराइजर्स हैदराबाद vs दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली, 2024
21 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु vs पुणे वॉरियर्स इंडिया, बंगळुरु, 2013
20 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु vs गुजरात लॉयंस, बंगळुरु, 2016
20 - दिल्ली कॅपिटल्स vs गुजरात लायन्स, दिल्ली, 2017
20 - मुंबई इंडियन्स vs सनराइजर्स हैदराबाद, हैदराबाद, 2024