IPL 2024 : `अरे तू उत्तर का देतोय...`, विराट कोहली अन् सुनील गावस्कर यांच्या जोरदार खडाजंगी; पाहा Video
Sunil Gavaskar On Virat Kohli : विराट कोहलीचा स्ट्राईक रेट आणि वक्तव्य यावरून सध्या क्रिडाविश्वात वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी विराटच्या टीकेवर उत्तर दिलंय.
Virat Kohli Interview Controversy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली. भारतीय संघात विराट कोहलीला (Virat Kohli) संधी मिळणार की नाही? असा प्रश्न विचारला जात होता. त्याला कारण विराट कोहलीचा स्टाईक रेट.. विराट कोहलीला स्टाईक रेटच्या आधारावर संधी मिळणार नाही, अशी टीका होत होती. आयपीएल सुरू असताना त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना विराट कोहलीचं टीम इंडियामध्ये सिलेक्शन झालं अन् विराटने टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर सुरू झाली विराट आणि सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्यात खडाजंगी.. प्रकरण इतकं तापलं की, सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीला धारेवर धरलं अन् टीका केली. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आयपीएलच्या टीव्ही ब्रॉडकास्ट पार्टनर स्टार स्पोर्ट्सने गेल्या आठवड्यापासून विराट कोहलीची मुलाखत चालवली. त्यात विराटने स्ट्राईक रेटवर प्रश्न विचारणाऱ्या टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. एकदा दोनदा नाही तर वारंवार विराटची क्लिप चालवण्यात आली होती. त्यावरून सुनील गावस्कर संतापले अन् लाईव्ह शोमध्ये झापलं. त्यावेळी त्यांनी विराटच्या वक्तव्यावर उत्तर देखील दिलंय.
नेमकं विराट काय म्हणाला होता?
काही लोक माझा टी-20 स्ट्राइक रेट आणि फिरकीविरुद्ध फलंदाजी करण्याची क्षमता यावरून मला कमी लेखतात. मात्र, माझ्यासाठी संघाला विजय मिळवून देणं महत्त्वाचं असणार आहे. जर तुम्ही सतत 15 वर्षांपासून खेळताय आणि टीमसाठी विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यात काहीही गैर नाहीये, असं मला वाटतं. कॉमेन्ट्री बॉक्समध्ये बसून टीका करता येते पण सामन्यात खेळाडूंना मेहनत घ्यावी लागते, असं विराट कोहली म्हणाला होता. विराटने सरळ सरळ समालोचकांना धारेधर धरलं होतं. विराटच्या या क्लिपवर सुनील गावस्कर चांगलेच भडकले.
काय म्हणाले गावस्कर?
जर तुम्ही दावा करताय की, तुम्ही बाहेरच्या बोलण्यावर लक्ष देत नाही. मग तुम्ही टीकेला उत्तर का देताय? आम्ही जे काही बोलतो त्यावर आम्ही बोलतो. जर तुमचा स्टाईक रेट हा 118 असेल आणि तुम्ही जर 14 व्या ओव्हरपर्यंत खेळत असाल तर हे सध्याच्या टी-ट्वेंटी क्रिकेटच्या दृष्टीने चुकीचं आहे, असं म्हणत गावस्करांनी विराट कोहलीची शाळा घेतली.
दरम्यान, आम्ही सर्वजण थोडे थोडे क्रिकेट खेळलो आहोत, पण आम्ही जे पाहतो ते बोलतो. मॅचनंतर ती मुलाखत अनेकदा दाखवण्यात आली. पण आम्ही समोर दिसणारी बाजू मांडतो. स्टार स्पोर्ट्सने ते पुन्हा दाखवले तर आम्ही नाराज होईल आणि त्यानंतर समालोकचकांवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असंही गावस्कर यांनी म्हटलं आहे.