चेन्नई सुपरकिंग्जने ऋतुराज गायकवाडे कर्णधारपद सोपवल्यानंतर हंगामाची चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नईने बंगळुरुचा सहा धावांनी पराभव केला. बंगळुरु संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावत 173 धावा केल्या होत्या. चेन्नईने अत्यंत सहजपणे धावांचा पाठलाग करत विजय नोंदवला. ऋतुराज गायकवाडचा कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना होता. त्यामुळे त्याच्यासाठी हा विजय फार महत्त्वाचा आहे. "मला फार विशेष वाटत आहे. पण मला स्वत:हून प्रयत्न करायचा आहे. दुसऱ्याच्या भूमिकेत जाण्याची इच्छा नाही," असं सामन्याच्या आधी त्याने सांगितलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋतुराज गायकवाडने ज्याप्रकारे पहिल्या सामन्यात संघाचं नेतृत्व केलं ते पाहून इरफान पठाण प्रभावित झाला आहे. "पहिल्या 26 चेंडूनंतर चेन्नईने अत्यंत उत्तम प्रकारे सामन्यात पुनरागमन केलं. दबावात असतानाही ऋतुराजने गोलंदाजीत केलेले बदल प्रभावित करणारे आहेत", अशी पोस्ट त्याने एक्सवर शेअर केली. 



सामना सुरु असताना महेंद्रसिंह धोनी क्षेत्ररक्षण लावताना दाखवण्यात आलं. कॅमेराही सतत धोनीवर जात होता. यानंतर विरेंद्र सेहवागने आपल्या पद्धतीने यावर टोला लगावला. 'भावा, ऋुतराजचा चेहरा दाखव एकदा, तोदेखील कर्णधार आहे. फक्त धोनीचाच चेहरा दाखवत आहे,' असं सेहवाग म्हणाला. 


प्रथम फलंदाजी करताना फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीने संघाला 41 धावांची भागीदारी करत दमदार सुरुवात करुन दिली. जवळपास 10 च्या सरासरीने दोघांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजी सुरु केली. खासकरुन फाफ डू प्लेसिसने गोलंदाजांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्याने 22 बॉलमध्ये 8 चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. मात्र मुस्तफिजुर रेहमानच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात ड्यु प्लेसिस झेलबाद झाला. त्यानंतर संघाच्या धावसंख्येत विराटने एका धावेची भर घालत स्कोअर 42 वर नेला. मात्र त्याला सोबत करण्यासाठी आलेले रतज पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी स्कोअरबोर्डमध्ये एकाही धावेची भर न परतले. दोघेही शून्यावर बाद झाले. 41 वर बिनबादवरुन बंगळुरुची अवस्था 42 वर 3 बाद अशी झाली. 


बंगळुरुने 20 ओव्हरमध्ये 173 धावा केल्या. 8 चेंडू आणि 6 विकेट्स बाकी असतानाच चेन्नईने हे लक्ष गाठलं आणि पहिल्या विजयाची नोंद केली.