Who is Angkrish Raghuvanshi : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात काल विशाखापट्टणम येथे सामना पार पडला. कालचा सामना श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने दिल्ली कॅपीटलच्या संघावर मोठा विजय मिळवला. या सामन्यादरम्यान कोलकाताने तब्बल 272 धावांचा डोंगर उभा केला. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाची दमछाक झाली. 17.2 ओव्हरमध्येच दिल्लीचा संघ 166 धावांवर तंबूत परतला. तर दुसरीकडे भारताचा युवा फलंदाज अंग्रकिश रघुवंश याने स्फोटक अर्धशतक केले. या अर्धशतकानंतर अंग्रकिश रघुवंश चर्चेत आला. आंक्रिस रघुवंशीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 27 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार मारत 54 धावा केल्या आहेत. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात त्याने प्रभावी खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये पदार्पण केले. परंतु त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिला डाव दिल्लीविरुद्ध खेळला गेला. 


अंगक्रिश रघुवंशी आहे तरी कोण? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंगक्रिश रघुवंशीचा जन्म 5 जून 2005 रोजी झाला असून त्याने क्रिकेट कौशल्य सुधारण्यासाठी गुडगाव सोडले. त्यानंतर वयाच्या 11 व्या वर्षी क्रिकेटसाठी मुंबईत आला. आंगक्रिश हा टॉप ऑर्डरचा फलंदाज असून तो ऑफ-स्पिन गोलंदाजी करू शकतो. अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2022 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप प्रसिद्धी मिळवली. त्या विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा आंगक्रिश खेळाडू ठरला. 2022 च्या विश्वचषकात त्याने 6 सामने खेळून 278 धावा केल्या होत्या. आपल्या कौशल्यावर काम करण्यासाठी आंगक्रिश मुंबईत अभिषेक नायरसोबत राहिला. यानंतर, खूप मेहनत घेतल्यानंतर तो विजय मर्चंट अंडर-16 ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळला. 2021 ची अंडर-19 विनू मांकड ट्रॉफी जिंकली. या वर्षी त्याने सीके नायडू ट्रॉफीमध्ये नऊ डावांत 765 धावा केल्या.


आंगक्रिश रघुवंशीने प्रशिक्षक मन्सूर अली खान यांच्या नेतृत्वाखाली गुडगाव येथे क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. काही काळानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या आंगक्रिश रघुवंशीच्या काकांनी त्याला मुंबईला जाण्याचा सल्ला दिल.  जिथे त्याला अभिषेक नायरच्या हाताखाली प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. आयपीएल 2024 बद्दल बोलायचे झाले तर, केकेआरने आंगक्रिश रघुवंशीला 20 लाख रुपयांना विकत घेतले.