IPL 2025 Auction: कोणत्या खेळाडूंसह होणार मेगा लिलावाची सुरुवात? जाणून घ्या सेट्सची स्थिती
IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएल 2025 साठीचा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह येथे होणार आहे. कोणत्या खेळाडूंपासून सुरु होणार जाणून घ्या.
IPL 2025 Mega Auction LIVE Updates in Marathi: अखेरीस अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असलेल्या आयपीएलच्या मेगा लिलाव आजपासून सुरु होणार आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 24 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेंबर या दोन दिवसात हा मेगा लिलाव होणार आहे. 10 संघ एकूण 641 कोटी रुपयांसह या बोलीमध्ये उतरणार आहेत. प्रत्येक संघाकडे 120 कोटी रुपये आहेत तर किमान आधारभूत किंमत 20 लाखांवरून 30 लाख रुपये करण्यात आली आहे. काही खेळाडूंवर 20 कोटी रुपयांचीही बोली लागू शकते असे सांगितले जात आहे. वेगेवगेळ्या सेट्समध्ये ही बोली लावली जाणार आहे. चला नक्की कसे सेट्स आहेत याबद्दल जाणून घेऊयात.
पहिल्या काही सेट्स स्थिती जाणून घ्या
पहिला सेट: जोस बटलर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कागिसो रबाडा, मिचेल स्टार्क.
दुसरा सेट: युझवेंद्र चहल, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मिलर, केएल राहुल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
तिसरा सेट: हॅरी ब्रूक, डेव्हॉन कॉनवे, जॅक फ्रेझर मॅकगर्क, एडन मार्कराम, देवदत्त पडिक्कल, राहुल त्रिपाठी, डेव्हिड वॉर्नर.
हे ही वाचा: आज होणार 577 खेळाडूंच्या भवितव्याचा फैसला, एका क्लिकवर मिळवा आयपीएल लिलावाची संपूर्ण
चौथा सेट: रविचंद्रन अश्विन, व्यंकटेश अय्यर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल, रचिन रवींद्र, मार्कस स्टॉइनिस.
पाचवा सेट: जॉनी बेअरस्टो, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, इशान किशन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा.
सहावा सेट: खलील अहमद, ट्रेंट बोल्ट, जोश हेझलवूड, आवेश खान, प्रसिध कृष्णा, टी नटराजन, ॲनरिक नॉर्टजे.
हे ही वाचा: IPL Mega Auction 2025: 'या' पाच खेळाडूंवर लागू शकते करोडोंची बोली
सातवा सेट : नूर अहमद, राहुल चहर, वानिंदू हसरंगा, महेश टीक्षाना, ॲडम झम्पा, वकार सलामखिल.
आठवा सेट: यश धुल, अभिनव मनोहर, करुण नायर, अंगकृष्ण रघुवंशी, अनमोलप्रीत सिंग, अथर्व तायडे, नेहल वढेरा.
नववा सेट: हरप्रीत ब्रार, नमन धीर, महिपाल लोमरोर, समीर रिझवी, अब्दुल समद, विजय शंकर, आशुतोष शर्मा, निशांत सिंधू, उत्कर्ष सिंग.
दहावा सेट: आर्यन जुयाल, कुमार कुशाग्रा, रॉबिन मिंज, अनुज रावत, लवनीथ सिसोदिया, विष्णू विनोद, उपेंद्र सिंह यादव.