Rohit Sharma IPL 2025 Mega Auction: आयपीएलचा नवा हंगाम सुरु होण्यासाठी अद्याप बराच अवधी बाकी आहे. पण त्याआधीच अनेक घडामोडी सुरु आहेत. नव्या हंगामाआधी ऑक्शन (IPL Auction) पार पडणार आहे. यात अनेक खेळाडूंना रिलीज केलं जाणार आहे. अशातच सोशल मीडियावर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) रोहित शर्माला (Rohit Sharma) नव्या हंगामात रिलीज करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.  असं झालं तर ऑक्शनमध्ये रोहित शर्मावर करोडो रुपयांची बोली लागू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माला रिलीज करणार?
रोहित शर्माचा भारतीय क्रिकेट इतिहासातल्या यशस्वी कर्णधारांमध्ये समावेश होतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच इंडियन प्रीमिअर लीगमध्येही रोहित शर्माचं प्रभावी नेतृत्वा पाहायला मिळालंय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली असून तब्बल पाच वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. पण यानंतरही गेल्या हंगामात रोहित शर्माची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. आता नव्या हंगामात रोहितला संघातूनही रिलीज केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. 


ऑक्शनमध्ये करोडो रुपयांची बोली
सोशल मीडिया एक्सवर  'रो45स्टान' नावाच्या एका युजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात मुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये रोहित शर्मावर बोली लावण्यासाठी कोरोडो रुपयांची बोली लागण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. दिल्ली आणि लखऊनने रोहित शर्माला खरेदी करण्यासाठी 50-50 कोटी वाचवून ठेवल्याचा दावाही करण्यात आला आहे. याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


रोहित आणि मुंबईचं नातं
तसं पाहिलं तर रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचं अगदी जूनं नातं आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात डेक्कन चार्जेसमधून केली. पण सुरुवातीच्या तीन हंगामानंतर तो मुंबई इंडियन्सशी जोडला गेला. आणि कमी वेळेतच त्याने मुंबई इंडियन्सची कमान सांभाळली. आयपीएलमध्ये रोहितचा पगार 2014 मध्ये 12.50 कोटी त 2018 मध्ये 15 कोटी रुपये झाली. 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहितसाटी 16 कोटी रुपये मोजले. आता 2025 मध्ये मुंबईने रोहित शर्माला रिलीज केलं. तर त्याच्यावर विक्रमी बोली लागू शकते.


2024 च्या हंगामापूर्वी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स आणि मिचेल मार्शवर 20 आणि 24 कोटी रुपयांची आतापर्यंतची सर्वाधिक बोली लागली होती. पण 2025 मध्ये रोहित शर्मा ऑक्शनसाठी उपलब्ध झाला तर यापेक्षाही विक्रमी बोली त्याच्यावर लागू शकते असं जाणकार सांगतात.