IPL 2025: आयपीएल 2025 मेगा लिलावाचं (IPL 2025 Mega Auction) काऊंटडाउन आता सुरु झाला आहे. यादरम्यान आता आयपीएल फ्रँचाईजी (IPL franchises) रिलीज आणि रिटेंशन लिस्टवर काम करत आहेत. दरम्यान बीसीसीआयने शनिवारी रिटेंशनचे नियम जाहीर केले आहेत. यामुळे आयपीएल फ्रँचाईजना मेगा लिलावात कोणते खेळाडू ठेवायचे आणि कोणते नाही याची यादी तयार करण्यात मदत मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने डायरेक्ट रिटेंशन किंवा राईट-टू-मॅच कार्डच्या मदतीने जास्तीत जास्त 6 खेळाडूंना रिटेन करता येईल असं सांगितलं आहे. तथापि, BCCI ने रिटेंशन खर्चात वाढ केल्यामुळे, खेळाडूंना ठेवणे आणि RTM द्वारे लिलावात खरेदी करणे यामधील परिपूर्ण संतुलन राखणं हीच यशाची गुरुकिल्ली असेल. 


लिलावापूर्वी सर्व 10 फ्रँचायझींनी 6 खेळाडूंना कायम ठेवण्याची शक्यता कमी असली तरी, ज्या खेळाडूंना संघात रिटेन केल जाण्याची शक्यता आहे अशा काही खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात. 


- चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, डॅरिल मिशेल, मथीशा पाथिराना, एमएस धोनी.


- मुंबई इंडियन्स: हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, अंशुल कंबोज


- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: विराट कोहली, मोहम्मद सिराज, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, यश दयाल


- राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा


- कोलकाता नाइट रायडर्स: श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, फिल सॉल्ट, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा


- गुजरात टायटन्स: शुभमन गिल, रशीद खान, डेव्हिड मिलर, साई सुधारसन, मोहम्मद शमी, राहुल तेवतिया


- लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल, क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, रवी बिष्णोई, मार्कस स्टॉइनिस, मयंक यादव


- दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, मिचेल मार्श, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल


- पंजाब किंग्स: सॅम कुरण, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा


- सनरायझर्स हैदराबाद: पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन, टी. नटराजन, नितीश कुमार रेड्डी


या अनकॅप्ड खेळाडूंची स्थिती 31 ऑक्टोबरपूर्वी बदलू शकते. बीसीसीआयच्या नियमांनुसार, अंतिम मुदतीपूर्वी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूला अनकॅप्ड मानले जाणार नाही. परंतु, जर एखाद्या खेळाडूने 1 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, तर तो अजूनही आयपीएल 2025 हंगामात अनकॅप्ड खेळाडू म्हणून जाईल.